तीन दिवसीय १९वा वार्षिक मेगा गोवा वर्ल्ड एक्स्पो २०२२ बांबोळी येथे ४ ऑगस्टपासून

.

 

तीन दिवसीय १९वा वार्षिक मेगा गोवा वर्ल्ड एक्स्पो २०२२ बांबोळी येथे ४ ऑगस्टपासून

पणजी ः १९व्या वार्षिक मेगा गोवा वर्ल्ड एक्स्पो २०२२ साठी गोवा सज्ज झाला आहे. ४ ते ६ ऑगस्ट या कालावधीत बांबोळी येथील डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी एसी स्टेडियममध्ये हा एक्स्पो रंगणार आहे.
तीन दिवस चालणार्‍या या एक्स्पोमध्ये भारतीय आदरातिथ्य व पर्यटन, ऑर्गेनिक फूड व पेय, आयुष व वेलनेस तसेच इंटिरियर्स व होम यांवर अधिक लक्ष्य केंद्रीत करण्यात येणार आहे.
गोव्यात तीन गीनिज विश्‍वविक्रम प्रस्थापित केलेल्या मुंबईस्थित गोमंतकीय उद्योग असलेल्या ट्रिनिटी व्हेंचर्सने या एक्स्पोचे आयोजन केले आहे.
या एक्स्पोमध्ये केंद्र सरकार तसेच राज्य सरकारच्या विविध मंत्रालयांकडून नागरिकांसाठी असलेल्या सुविधांची तसेच योजनांची माहिती दिली जाणार आहे. शंभराहून अधिक ब्रँड्‌स या एक्स्पोमध्ये आपल्या विविध अद्ययावत उत्पादनांचे सादरीकरण यामध्ये करणार आहेत. यामध्ये बेकरी व कुलिनरीमधील आव्हाने, जपानचे प्रशिक्षित शेफस् सुशीचे रहस्य तसेच भारताचे चीज मास्टर्स विविध प्रकारच्या चीजची माहिती व प्रात्यक्षिके देतील याव्यतिरिक्त नानातर्‍हेचे भारतीय व कॉंटिनेंटल व पॅन एशियन कुजिन आदी या एक्स्पोच्या खासियतींमध्ये आहे.
केंद्रीय पर्यटन, जहाज, जलमार्ग व बंदर राज्यमंत्री श्रीपाद नाईक, गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत तसेच अन्य मंत्रीदेखील या एक्स्पोला उपस्थित राहणार आहेत.
जैवविविधता, शेती, पर्यटन, आयुष, एफडीए आदी सरकारी खाते- विभाग आपल्या कार्याची व उपलब्धतेची माहिती लोकांना देणार आहे.
ट्रिनिटी समुहाचे अध्यक्ष जोसेफ डायस यावेळी बोलताना म्हणाले की, गोव्यात मोठ्या संख्येने देशातून तसेच विदेशातून गोमंतकीयांसह संयुक्त उपक्रम राबविण्याच्या हेतूनेच हा एक्स्पो मोठ्या स्तरावर आयोजित करण्यात आला असून याद्वारे गोव्याच्या अर्थव्यवस्थेला बळकटी प्राप्त होऊ शकते तसेच गोमंतकीयांना याचा मोठा फायदा होऊ शकतो.
गोव्यात संपूर्ण १२ महिने पर्यटन मोसम असावा. हॉटेल, पर्यटन व फूड इंडस्ट्रीला एकत्र आणण्याचे ट्रिनिटी ग्रुपचे उद्दिष्ट आहे.
मागील १८ वर्षांपासून या एक्स्पोचे गोव्यात आयोजन केले जात आहे. केवळ भारतातील उद्योगांकडूनच नव्हे तर विदेशातूनही उद्योजक यासाठी येण्यास इच्छुक आहेत. या प्रकारची व्यवस्था केवळ दिल्लीत आहे. गोव्यातील हा एक्स्पो देशातीस दुसर्‍या क्रमांकाचा सर्वांत मोठा असेल. गोमंतकीय याचा भाग आहेत, याचा आनंद आहे, असे डायस म्हणाले.
गोवा कुलिनरी क्लब अध्यक्ष ओदेत मास्कारेन्हस यांनी सांगितले की या एक्स्पोचे ध्येय हे गोमंतकीय खाद्यसंस्कृती जगाच्या नकाशावर आणण्याचे आहे.
आज गोवा ही देशाची खाद्य राजधानी आहे. या एक्स्पोमध्ये आम्ही शेफच्या कौशल्याची झलक दाखवणार आहोत. विविध खाद्य पदार्थ फुड एन्सेम्बल या घोषणेखाली शेफस् करून दाखवणार आहेत. यात गोमंतकीय, मॉडर्न पॅन एशियन, ट्रॉपिकल तसेच डेझर्टचा समावेश असेल, असे मास्कारेन्हस म्हणाल्या.
या एक्स्पोमध्ये होम बेकर्स व होम शेफस्‌मध्ये स्पर्धा देखील असेल असे, कुलिनरी फोरम ऑफ गोवाचे व गोवा कुलिनरी क्लबचे उपाध्यक्ष शेफ सुनीत शर्मा म्हणाले.
मागील दोन वर्षांत कोरोना काळात भरपूर फूड व्यावसायिक तसेच उद्योजक आले आहेत. व्यवसाय म्हणून खाद्यपदार्थांक़डे न पाहिलेल्यांनी व्यावसायिकतेची वाट चोखाळली आहे. यात प्रामुख्याने घरी बनविण्यात येणार्‍या पदार्थांचा समावेश असल्याचे ते म्हणाले.
कुलिनरी फोरम ऑफ गोवाचे अध्यक्ष मंजीत सिंगदेखील यावेळी उपस्थित होते.

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें