म्हापसा वाताहार पिर्ण येथील शांतादुर्गा हायस्कूल येथे लोकमान्य टिळक पुण्यतिथी साजरी करण्यात आली
या निमित्ताने जायट् ग्रुप ऑफ थिवीने घेतलेल्या ॲपटिटूट टेस्ट मध्ये यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांना प्रमुख पाहुणे मंडळाचे अध्यक्ष तथा गोवा भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र व ट्रॉफी देण्यात आली. या दिवसाचे औचित्य साधून जम्मू काश्मीर येथील विकास मानहत् यांनी मुलांना शहीद सुधीर वालीया यांची प्रेरणादायी शौयकथा सांगितली.
यावेळी व्यासपीठावर हायस्कूल च्या मुख्याध्यापिका राजनीता सावंत, जायंटस ग्रुप ऑफ थिवीचे अध्यक्ष निलेश होडारकर, जायंटस फेडरेशन १० चे अध्यक्ष बसवराज पुजारी, शांतादुर्गा उच्च माध्यमिक विद्यालय चे प्राचार्य उमेश नाईक, पिर्ण ग्राम सेवा मंडळ चे अध्यक्ष सदानंद तानावडे, खास अतिथी विकास मानहत् आदी उपस्थित होते. याप्रसंगी सदानंद तानावडे यांनी मुलांना मार्गदर्शन केले. कार्यक्रम चे सुत्रसंचालन मंजीता किनळेकर हीने केले तर अक्षता बवै हिने आभार मानले