महिंद्रा’तर्फे स्थानिक समुदायांना शाश्वत इंधन व्यवस्थापनासाठी प्रोत्साहन
~आठशे घरांना स्टोव्हजचे दान
Panaji, 3 ऑगस्ट २०२२ : ‘क्लब महिंद्रा’ या महिंद्रा हॉलिडेज अँड रिसॉर्ट्स इंडिया लिमिटेडच्या प्रमुख ब्रँडतर्फे मसुरी आणि वर्का येथील स्थानिक समुदायांमध्ये शाश्वत इंधन-लाकूड व्यवस्थापनाच्या प्रचाराचे काम करण्यात येत आहे.
या दोन्ही गावांमधील काही समुदायांमध्ये अन्न शिजविण्याच्या शाश्वत व स्वच्छ पद्धतींचा प्रसार करण्याच्या दृष्टीने ‘क्लब महिंद्रा’ने ‘संभव फाउंडेशन’ या संस्थेच्या सहकार्याने जनजागृती मोहीम आखली आहे. त्यायोगे येथील रहिवाशांना स्टोव्ह पुरविण्यात येत आहेत. दररोजच्या स्वयंपाकासाठी या स्टोव्हजा वापर कसा करायचा हे या रहिवाशांना शिकविण्यात येत आहे. उत्तराखंडमधील मसुरी आणि गोव्यातील वर्का या दोन्ही गावांमध्ये क्लब महिंद्राची रिसॉर्ट्स आहेत. या गावांमध्ये हा प्रकल्प राबविण्यात येत आहे.
‘क्लब महिंद्रा’तर्फे ज्या ८०० घरांमध्ये स्टोव्हसारखा अन्न शिजवण्याचा शाश्वत उपाय पुरविण्यात आला, तेथे आतापर्यंत जळाऊ लाकडाचा उपयोग करण्यात येत होता. कूकस्टोव्हमुळे रहिवाशांना किफायशीर पर्यायही उपलब्ध होत आहे, तसेच लाकडाचा वापर टळून हानिकारक प्रदूषण कमी होणार आहे.
आपल्या आसपासच्या समाज घटकांच्या उन्नतीसाठी सदैव कटिबद्ध असणाऱ्या क्लब महिंद्रातर्फे या ठिकाणी स्टोव्हचा पुरवठा तर होणारच आहे, त्याशिवाय संबंधित समुदायांना स्वयंपाकासाठी कूकस्टोव्हचे आणि इंधन स्टॅकिंगचे महत्त्व समजावून देऊन, इंधनाच्या वापराबाबत जागरुकता निर्माण करण्यात येणार आहे. ‘क्लब महिंद्रा’चा हा प्रकल्प संयुक्त राष्ट्रसंघाच्या शाश्वत विकास लक्ष्य क्र. ७ नुसार, शाश्वत व हरित ऊर्जेच्या तरतुदींनुसार आयोजित होत आहे.
—
For further details, please contact Adfactors PR:
Priya Shetty | Adfactors PR | +91 9870774424 | priya.shetty@adfactorspr.com
Nusrat Naik| +91 9769067619 | nusrat.naik@adfactorspr.com
About Mahindra Holidays & Resorts India Limited
Mahindra Holidays & Resorts India Limited (MHRIL), India’s leading company in the leisure hospitality industry, offers quality family holidays primarily through vacation ownership memberships. While Club Mahindra is the flagship brand with a 25-year membership, the other products offered by the company are – Bliss, Go Zest, Club Mahindra Fundays and Svaastha Spa.
As of September 30, 2021, MHRIL has 78 resorts across India & abroad and its subsidiary, Holiday Club Resorts Oy, Finland, a leading vacation ownership company in Europe has 33 Timeshare Destinations and 9 Spa Resorts across Finland, Sweden and Spain.
Visit us at www.clubmahindra.com
About Mahindra
Founded in 1945, the Mahindra Group is one of the largest and most admired multinational federations of companies with 260,000 employees in over 100 countries. It enjoys a leadership position in farm equipment, utility vehicles, information technology and financial services in India and is the world’s largest tractor company by volume. It has a strong presence in renewable energy, agriculture, logistics, hospitality and real estate. The Mahindra Group has a clear focus on leading ESG globally, enabling rural prosperity and enhancing urban living, to drive positive change in the lives of communities and stakeholders to enable them to rise.