हिंदु जनजागृती समितीकडून* *‘राष्ट्रध्वजाचा सन्मान राखा !’ उपक्रमांतर्गत विविध विद्यालयांमध्ये जागृती*

.

 

 

*हिंदु जनजागृती समितीकडून* *‘राष्ट्रध्वजाचा सन्मान राखा !’ उपक्रमांतर्गत विविध विद्यालयांमध्ये जागृती*

पणजी, 4 ऑगस्ट – देशात स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाला अनुसरून ‘हर घर तिरंगा’ उपक्रम राबवला जात आहे. या अंतर्गत 13 ते 15 ऑगस्ट 2022 या कालावधीत भारतभर प्रत्येक घरावर तिरंगा फडकवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. ही एक आनंदाची गोष्ट आहे; मात्र हे करतांना राष्ट्रध्वजाचा कोणत्याही प्रकारे अवमान होणार नाही, याचीही दक्षता सर्वांनी घेतली पाहिजे. अशोकचक्रासह तिरंग्याचा मास्क बनवणे आणि वापरणे, हा ध्वजसंहितेनुसार राष्ट्रध्वजाचा अवमानच असल्याने ‘तिरंगा मास्क’ची खरेदी करू नये. अनवधानानेही राष्ट्रध्वजाचा अवमान तथा विटंबना विद्यार्थ्यांकडून होऊ नये, यासाठी विद्यार्थ्यांचे प्रबोधन करावे, असे आवाहन हिंदु जनजागृती समितीने राज्यातील विविध विद्यालयांना भेट देऊन त्यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केले आहे. हिंदु जनजागृती समिती राबवत असलेल्या ‘राष्ट्रध्वजाचा सन्मान राखा !’ उपक्रमांतर्गत हिंदु जनजागृती समितीच्या शिष्टमंडळाने विविध विद्यालयांना भेट दिली.
कुडणे, न्हावेली, आमोणा, सांखळी, होंडा, कवळे, तळावली, बांदोडा, मये, वास्को, चोडण, डिचोली, काणकोण, शिवोली, वाळपई, आदी ठिकाणची विद्यालये आणि महाविद्यालये यांना हे निवेदन देण्यात आले आहे. या भेटीनंतर अनेक शाळांनी विद्यार्थ्यांसाठी ‘राष्ट्रध्वजाचा सन्मान राखा’ या विषयावर मार्गदर्शन करावे, तसेच क्रांतीकारकांचे छायाचित्र आणि माहिती असलेल्या फ्लेक्सच्या फलकांचे प्रदर्शन भरवावे, अशा मागण्या हिंदु जनजागृती समितीकडे केल्या आहेत.

(

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar