श्री दुर्गा इंग्लिश स्कूल “मध्ये लो. टिळक पुण्यतिथी साजरी

.

श्री दुर्गा इंग्लिश स्कूल “मध्ये लो. टिळक पुण्यतिथी साजरी

श्री दुर्गा इंग्लिश स्कूल पार्से येथे लोकमान्य टिळक पुण्यतिथी उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी व्यासपीठावर श्री दुर्गा हायस्कूलचे चेअरमन श्री. रामनाथ सावंत, शाळेचे ज्येष्ठ शिक्षक श्री. हृदयनाथ तांबोस्कर, शिक्षिका अनुपमा आरोलकर व इतर मान्यवर उपस्थित होते.
सर्वप्रथम दीपप्रज्वलन करून टिळकांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला, श्री. सावंत सर यांनी मुलांना मार्गदर्शन करून आवाहन केले की त्यांनी मोठ्या हिरिरीने विविध स्पर्धांमध्ये सहभागी व्हावे आपल्या अंगचे विविधांगी गुण सर्वांसमोर आणावेत. श्री. तांबोस्कर यांनी आपल्या भाषणात सांगितले की आजच्या पिढीला टिळकांच्या विचारांची नितांत गरज आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांनी टिळकांच्या जीवन कार्याचा अभ्यास करावा व त्यांचे विचार आत्मसात करून अमलात आणावेत.
यावेळी शिक्षक व विद्यार्थ्यांची समयोचित भाषणे झाली. या कार्यक्रमाचे औचित्य साधून एकपात्री अभिनय स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत प्रथम- कु. नेहा निवृत्ती मयेकर, द्वितीय- कु.रिया भिकाजी कोलकर, तृतीय- कु. शिवानी भालचंद्र शेट व उत्तेजनार्थ प्रथम कु. निमिषा मेघ:शाम कांबळी तसेच भाषणात कु. सौरव संजीव कानोळकर यास विशेष विजेता असे क्रमांक मिळाले. कार्यक्रमाचे सूत्रनिवेदन शिक्षिका प्रतिक्षा नाईक हिने केले. स्पर्धेचे परीक्षक म्हणून अनंत कौशल, हृदयनाथ तांबोस्कर, हर्षा मळीक व स्वाती तोरस्कर यांनी काम पाहिले, हा कार्यक्रम शाळेचे मुख्याध्यापक श्री. बाळकृष्ण बर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला.

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar