लायन्स क्लब ऑफ थिवी चा अधिकारग्रहण सोहळा लिवरामेंट सभागृह थिवी येथे पार पडला.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे गुरुदत्ता भक्ता तर अध्यक्ष स्थानी नितीन मगनलाल उपस्थित होते
यावेळी लायन्स क्लब थिवी चे अध्यक्ष म्हणून श्रवण वेरेकर यांना शपथग्रहण अधिकारी वासुदेव वालावलकर यांनी शपथ दिली. यावेळी व्यासपीठावर माजी अध्यक्ष हेरंब कपै, सचिव सुश्मिता कपै, झेवियर फेर्नांडिस्, अल्ब्रिटो आदी उपस्थित होते. लायन्स क्लब थिवी चे अध्यक्ष तथा लियो क्लब थिवी च्या संचालक मंडळला शपथ ग्रहण अधिकारी वासुदेव वालावलकर यांनी शपथ दिली. सचिव सुश्मिता कपै यांनी मागील वर्षी चा अहवाल सादर केला. प्रमुख पाहुणे गुरुदत्ता भक्ता यांनी लायन्स क्लब थिवी करीत असलेल्या समाजोपयोगी उपक्रम बद्दल त्यांनी त्याचे कौतुक केले. याप्रसंगी नितीन मगनलाल यांनी बहुमुल्य असे मार्गदर्शन केले. ॲथनी यांनी आभार मानले.