डॉ. के.ब. हेडगेवार विद्यालय अस्नोडा येथे लोकमान्य टिळक पुण्यतिथी निमित्ताने कार्यक्रम.

.

डॉ. के.ब. हेडगेवार विद्यालय अस्नोडा येथे लोकमान्य टिळक पुण्यतिथी निमित्ताने कार्यक्रम.

दि. ०१ ऑगस्ट रोजी डॉ. के.ब. हेडगेवार विद्यालय अस्नोडा येथे लोकमान्य टिळक पुण्यतिथी निमित्ताने कार्यक्रम करण्यात आला. यावेळी इयत्ता तिसरीतील कु. विहान आशिष मराठे याने टिळकांची वेशभूषा केली तसेच इयत्ता सहावीतील विद्यार्थी कु.सलील राऊत, कु धनदा राऊत, कु. बानी कामत, कु. चिराग राऊत, कु . तनिष्का च्यारी या विद्यार्थ्यांनी टिळकांविषयी त्यांचे विचार व्यक्त केले. यावेळी प्राथमिक तसेच माध्यमिक विभागाची हस्ताक्षर स्पर्धा घेण्यात आली.

नागपंचमी निमित्ताने शिक्षक श्री प्रज्वल साळगांवकर यांनी विद्यार्थ्यांना सापांविषयी समज आणि गैरसमज तसेच विषारी बिनविषारी साप याबद्दल चित्रे दाखवून माहिती सांगितली.

त्यानंतर नेस्ले कंपनी तर्फे आयोजित जल संवर्धन या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी सौ. प्रिया मळीक आणि अनुपा गावडे यांची उपस्थिती लाभली. या वेळी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना पाण्याचे संवर्धन करणे हे किती आवश्यक आहे तसेच ते कसे करता येईल यावर त्यांनी मार्गदर्शन केले. विविध चित्रे तसेच व्हिडीओ दाखवून त्यांनी विद्यार्थ्यांना पाणी वाचवण्याविषयी जागरूक राहण्यास आवाहन केले. विद्यार्थ्यांना विविध प्रश्न विचारून त्यांना भेटवस्तूही दिल्या. या कार्यक्रमात शाळेचे व्यवस्थापक श्री सदानंद डिचोलकर यांची विशेष उपस्थिती लाभली.

संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षिका सौ. किमया कपिल वझे यांनी केले तर आभार प्रकटन विद्यालयाच्या प्रभारी मुख्याध्यापिका सौ. श्रेया केळकर यांनी केले. शांतिमंत्राने कार्यक्रमाचा समारोप केला.

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar