शिक्षकांनी पालक व विद्यार्थ्यांच्या सहकार्याने शाळेच्या परिसरात केले श्रमदान

.

“शिक्षकांनी पालक व विद्यार्थ्यांच्या सहकार्याने शाळेच्या परिसरात केले श्रमदान

 

युवा सांस्कृतिक समिती संचालित, श्री सरस्वती विद्यामंदिर, वागाळी, कामुर्ली येथे शनिवारी   “श्रमदान” हा उपक्रम राबविण्यात आला.

श्रमदान म्हणजे शारीरिक श्रमाचा समावेश असलेल्या समाजाच्या कल्याणासाठी व्यक्तीने केलेले ऐच्छिक योगदान. आमच्या विद्यार्थ्यांमध्ये श्रमदानाची भावना जागृत करण्यासाठी आम्ही त्यांना शाळेचा परिसर स्वच्छ करण्यास प्रोत्साहित केले. श्रमदानात समाजसेवा, वृक्षरोपण आणि स्वच्छता किंवा आपल्या सभोवतालचे पर्यावरण चांगल्या प्रकारे बदलण्यात मदत करण्याचा हा एक मार्ग आहे.
श्री सरस्वती विद्यामंदिर येथे, सर्व विदयार्थी, पालक आणि शिक्षकांनी मिळून शाळेत आयोजित केलेल्या श्रमदान उपक्रमात उत्साहाने सहभाग घेतला. कारण ते आपल्याला सहकार्य, एकता, संघभावना, नेतृत्व इत्यादी अनेक मूल्ये शिकवते. सदर उपक्रमात पालक शिक्षक संघाची अध्यक्ष सौ. श्रद्धा सिद्धार्थ खोर्जुवेकर व उपाध्यक्ष सौ. सलोनी नाईक यांनी देखील या उपक्रमात उत्साहाने भाग घेतला. युवा सांस्कृतिक समितीचे सदस्य श्री. अरविंद वायंगणकर यांनी शाळेच्या परिसरात वाढलेले गवताची कापणी करून शाळेचा परिसर स्वच्छ केला. त्यानंतर सर्वांनी मिळून शाळेच्या सभोवती वेगवेगळी फुलझाडे, शोभेचीझाडे, व
औषधी वनस्पतींची रोपटे लावली.

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें