बादैश पतंजली योग समीती आयोजित कोलवाळ येथील विश्वकर्मा मंदिरात जडीबुटी कार्यक्रम पार पडला. सकाळी हवनयज्ञ केल्या नंतर सावळाराम यांच्या बागेत जडीबुटी औषधी वनस्पती लावण्यात आली. यावेळी योग शिक्षक संदीप मोरजकर, किसान राज्य प्रभारी तुलसीदास मंगेशकर, बादैश पतंजली योग समीती अध्यक्ष अशोक साळगावकर, नंदकुमार रायकर, भावना चोडणकर, पुजा मंगेशकर, सिद्धैश राऊत, प्रकाश सांगोडकर, डॉ. अरुंधती सडेकर, अंजली च्यारी, सनी, सुधीर रीवणकर, शिल्पा शिरोडकर आदी उपस्थित होते.