देश रक्षणासाठी आपल्या प्राणाची आहूती देऊन भारतमातेचा मान सन्मान वाढविणारे खऱ्या अर्थाने भाग्यवान आहेत, इतिहास या शुर वीरांचे धाडस, शौर्य आणि त्यांच्या त्यागाची निश्चितच नोंद घेईल असे उदगार जम्मू काश्मीर मधील विकास मानहत् यांनी कोलवाळ येथे काढले
जायंटस ग्रुप ऑफ थिवी आयोजित कोलवाळ येथील श्री राम मंदिर विद्यामंदिर ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
यावेळी त्यांनी कारगील युद्धामध्ये शहीद झालेल्या कैप्टन अमित भारद्वाज यांची शौरकथा सांगताना त्यांचे बलीदान आजच्या युवकांना लष्करात भरती होऊन देशसेवा करण्यासाठी प्रेरणास्थान ठरेल असे पुढे बोलताना सांगितले.
विकास मानहत् हे देशातील विविध राज्यात जाऊन मुलांना शहीद जवानांच्या शौर्य कथा ऐकवितात व त्या च एक भाग म्हणून कोलवाळ येथील श्री राम मंदिर विद्यामंदिरात कार्यक्रमाच आयोजन केले होते.
यावेळी त्याच्याच हस्ते जायंटस ग्रुप ऑफ थिवी ने घेतलेल्या प्रश्न मंजुषा स्पर्धेत विजेत्यांना बक्षिसे देण्यात आली.
यावेळी व्यासपीठावर श्रीराम विद्यामंदिर च्या मुख्याध्यापिका जोयना मोंतेरो, जायंटस ग्रुप फेडरेशन १० चेअरमन बसवराज पुजारी, नागाशेटी, जायंटस ग्रुप ऑफ थिवी चे अध्यक्ष निलेश होडारकर आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इंडिसी डायस यांनी केले तर गौरवी माद्रेंकर हिने आभार मानले.