लियो क्लब ऑफ थिवी युथ आणि लायन्स क्लब ऑफ थिवी यांच्या तफै दुसरा अधिकार ग्रहण सोहळा आणि संचालक मंडळाची निवड करण्यात आली. हा कार्यक्रम आसगाव येथील आग्नेल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी  काॅलेज येथे पार पडला. 

.

 

लियो क्लब ऑफ थिवी युथ आणि लायन्स क्लब ऑफ थिवी यांच्या तफै दुसरा अधिकार ग्रहण सोहळा आणि संचालक मंडळाची निवड करण्यात आली. हा कार्यक्रम आसगाव येथील आग्नेल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी  काॅलेज येथे पार पडला.
या कार्यक्रमाला प्रमुख वक्ते अल॑ ब्रिटो तर शपथग्रहण अधिकारी म्हणून युलरीको रॉड्रिग्ज उपस्थित होते लियो क्लब ऑफ थिवी चे अध्यक्ष रोहन दिवकर यांना रौडिगीज यांनी शपथ दिली. यावेळी व्यासपीठावर हेरंब कपै, मावळते अध्यक्ष चिन्मय देसाई, सचिव समृद्धी रायकर आदी उपस्थित होते.
२०२१-२२ या वर्षी चा अहवाल सचिव सोनाली गोवेकर हिने सादर केला. सिद्धी कपै मान्य वराची ओळख करून दिली.
संचालक मंडळावर आमीर खान, संकल्प गडेकर, शुभम सावंत, कृष्णकांत तार, जाॅयल कुतिहो, ॲन्डी फनाडिस यांची निवड झाली. प्रमुख वक्ते अल॑ ब्रिटो यांनी यावेळी सांगितले की सतत कार्यरत राहणारे नेतृत्व क्लबसाठी महत्त्वपूर्ण ठरेल. कौशल्य, क्षमता, अनुभव व ज्ञान हे चार घटक फार महत्त्वाचे असल्यचे  त्यांनी पुढे बोलताना सांगितले. यावेळी लियो क्लब ऑफ थिवी स्थापन करण्यात योगदान दिलेले आश्विन कुमार कपै व हेरंब कपै या दोघांचे विशेष आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एंजिया फेर्नांडिस् हिने केले तर आभार समृद्धी रायकर हिने केले

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar