मीशो अॅप आता मराठीत उपलब्ध
मीशो अॅप आता मराठीत उपलब्ध
लाखो मीशो ग्राहक आता बंगाली, तेलुगु, मराठी, तमिळ, गुजराती, कन्नड, मल्याळम आणि ओडिया यांसारख्या भाषांमध्ये सहजतेने आरामात खरेदी करू शकणार
राष्ट्रीय, १० ऑगस्ट २०२२: भारतातील सर्वात वेगाने वाढणारी इंटरनेट कॉमर्स कंपनी मीशोने आज प्रत्येकासाठी इंटरनेट कॉमर्सचे लोकशाहीकरण करण्याच्या आपल्या ध्येयाच्या अनुषंगाने आपल्या प्लॅटफॉर्मवर आठ नवीन स्थानिक भाषा जोडण्याची घोषणा केली. देशाच्या कानाकोपऱ्यातील लाखो वापरकर्ते या प्लॅटफॉर्मवर व्यवहार करतील अशी अपेक्षा असताना, सणासुदीच्या अगदी आधी हे पाऊल उचलण्यात आले आहे. या अतिरिक्त भाषा बंगाली, तेलुगु, मराठी, तमिळ, गुजराती, कन्नड, मल्याळम आणि ओडिया आहेत. मीशो ग्राहक आता खाते आणि उत्पादन माहिती अॅक्सेस करण्यासाठी, ऑर्डर देण्यासाठी आणि ऑर्डर कुठवर आली हे बघण्यासाठी आणि Android फोन वर पेमेंट करण्यासाठी त्यांची पसंतीची भाषा निवडू शकतात.
गेल्या वर्षी मीशोने प्लॅटफॉर्मवर एक भाषा पर्याय म्हणून हिंदीची ओळख करून दिली. आतापर्यंत ही भाषा वापणाऱ्यांच्या संख्येत २०% वाढ दिसून आली आहे. मीशोचे बहुतांश ग्राहक अहमदाबाद, वडोदरा आणि जमशेदपूर यांसारख्या टियर 2+ शहरांमधून आणि बिगर हिंदी भाषिक राज्यांमधून येतात, जिथे इंग्रजी किंवा हिंदी नेहमीच पसंतीची भाषा नसते. या नवीनतम उपक्रमामुळे या क्षेत्रांमध्ये मीशोच्या अवलंबनाला चालना मिळेल आणि लाखो ग्राहकांसाठी ऑनलाइन खरेदीचा अनुभव आणखी सुलभ होईल.
या नवीन भाषांमध्ये अचूक आणि अस्सल अनुभव सुनिश्चित करण्यासाठी मीशोने वापरकर्त्याच्या संशोधनातून योग्य माहिती प्राप्त केली आणि तज्ञ भाषा अभ्यासकांसोबत जवळून काम केले. टीमने शब्दश: भाषांतरापेक्षा दैनंदिन भाषेचा लहेजा जपत खरेदीचा अनुभव अखंडपणे घेता यावा यासाठी सर्वसामान्यपणे वापरले जाणारे सोपे शब्द वापरले. उदाहरणार्थ हिंदीतील ‘आवश्यक’ या शब्दाचे शाब्दिक भाषांतर ‘अनिवार्य’ आहे परंतु ‘जरूरी’ हे अधिक व्यापकपणे समजले जाते. एकुणात साधारण ३३,००० इंग्रजी शब्दांचे प्रत्येकी आठ भाषांत भाषांतर करण्यात आले.
“हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे की आमचे ५०% वापरकर्ते ई-कॉमर्ससाठी नवीन आहेत आणि त्यांनी कदाचित यापूर्वी कधीही अशा प्लॅटफॉर्मवर व्यवहार केले नाहीत. प्लॅटफॉर्मवर स्थानिक भाषा सादर करून, मीशोने भाषेतील अडथळे दूर करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. भारतातील पुढील अब्जावधी वापरकर्त्यांसाठी एकच शॉपिंग डेस्टिनेशन बनण्याचा आमचा प्रवासासाठी उचललेले हे एक नैसर्गिक पाऊल आहे. आमच्या टीम्सनी पडद्यामागे अथक परिश्रम करून हे प्लॅटफॉर्म या सर्व ८ स्थानिक भाषांमध्ये १००% अचूक आणि सूचक असल्याची खात्री केली आहे,” असे मीशोचे संस्थापक आणि सीटीओ संजीव बर्नवाल म्हणाले.
अलीकडेच व्यवहार करणाऱ्या १०० दशलक्ष वापरकर्त्यांपर्यंत पोहोचणारी मीशो ही भारतातील सर्वात जलद ई-कॉमर्स कंपनी बनली आहे. मार्च २०२१ पासून प्लॅटफॉर्मवर व्यवहार करणाऱ्या वापरकर्त्यांची संख्या ५.५ पट वाढली आहे तर वर्गीकरण त्याच कालावधीत ९ पट ते ७२ दशलक्ष वाढले आहे. टियर २+ मार्केटमधील ग्राहक या वाढीचे प्रमुख चालक आहेत. सर्व खरेदीदारांमध्ये त्यांचे प्रमाण ८०% आहे.
मिशो विषयी:
मिशो हा भारतातील वेगाने वाढत असलेला इ-कॉमर्स प्लॅटफॉर्म आहे. मिशो इंटरनेट व्यापाराचे लोकशाहीकरण करत आहे आणि विविध उत्पादनांची मालिका आणि नवीन ग्राहक ऑनलाईन क्षेत्रात आणत आहे. मिशोची बाजारपेठ लघुउद्योग, सूक्ष्म,लघु आणि मध्यम उद्योग आणि स्वतंत्र व्यावसायिक यांचा समावेश असलेल्या छोट्या व्यवसायांना लाखो ग्राहक पुरविते. ७०० हून अधिक विभाग, संपूर्ण भारतभर संपर्क, पुरवठा साखळी, पेमेंट सेवा आणि मिशो परिसंस्थेवर आपला व्यवसाय समर्थपणे चालविण्यासाठी ग्राहक पाठबळ क्षमता पुरविते.