स्वातंत्र्याच्या अमृत मोहत्सवाच्या निमित्ताने कोलवाळ येथिल श्रीराम विद्या मंदिर प्राथमिक विद्यालयाच्या आवारात व्यवस्थापक माधवी हळर्णकर यांच्या मार्गदर्शनाखाली विविध कार्यक्रम आयोजित

.

स्वातंत्र्याच्या अमृत मोहत्सवाच्या निमित्ताने कोलवाळ येथिल श्रीराम विद्या मंदिर प्राथमिक विद्यालयाच्या आवारात व्यवस्थापक माधवी हळर्णकर यांच्या मार्गदर्शनाखाली विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले. वेषभूषा स्पर्धा आणी देश भक्ति गीत गायन स्पर्धा घेण्यात आले व वरिष्ठ किग्रॅचे नृत्य होते.
यावेळी प्राथमिक विद्यालयाचे प्रभारी प्रमुख सुजाता पास्ते, पूर्व प्राथमिक प्रमुख रिटा कारतोर्झो ,
शिक्षिका अंकिता पालेकर , स्नेहा हळर्णकर, दीक्षा कामत,प्रणोती फर्नांडिस,वैष्णवी धरणे,प्राथमिक विद्यालयाचे विद्यार्थी व इतर उपस्थित होते.
देश भक्ति गीत गायन स्पर्धेत पहली ते चौथीच्या विद्यार्थ्यांनी भाग घेतला.
तर इयत्या तिसरीच्या मुलानी पहिला क्रमांक पटकाविला.
वेषभूषा स्पर्धा कार्यक्रम दोन वेगवेगळ्या श्रेणींमध्ये घेण्यात आला. श्री वेताल इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशन अँड ट्रेनिंगच्या दोन डी.एड प्रशिक्षणार्थी शिक्षक साई नागवेकर आणी दीप्ती कुडव ह्यांनी कार्यक्रमाचे परीक्षण केले. शिक्षिका अंकिता पालेकर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. स्पर्धेनंतर सर्वांनाच बक्षिसाची उत्सुकता होती. श्रेणी 1 मधून प्रथम क्रमांकाचे विजेते दुर्वा विश्वनाथ चोडणकर ठरली. सान्वी सुरेंद्र नाईक द्वितीय क्रमांक पटकाविला व आदित्यसिंग केहरसिंग राठोड आणि यशवंत राजाराम परब हे तृतीय क्रमांकाचे विजेते ठरले. श्रेणी 2 मधून महज विनायक पोरोब प्रथम क्रमांक पटकाविला, परनवी केशव हर्डणकरनी द्वितीय क्रमांक पटकाविला व अवनीश किशोरकुमार नाईक आणि मनस्वी मनोज माळगावकर यांनी तृतीय क्रमांकाचे विजेते ठरले. शिक्षिका स्नेहा हळर्णकर यांच्या आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता झाली.

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar