स. प्रा वि. मधला वाडा केरी शाळेची रक्षाबंधन अनोखा उपक्रम,,,,,
स.प्रा. वि. मधला वाडा केरी शाळेने आपली रक्षाबंधन ची अनोखी परंपरा राखत यंदा आपले रक्षण करणारे आपले पोलिस आणि तसेच निसर्ग हे सुद्धा आपले रक्षण करतात म्हणून शाळेने यंदा पोलिस कॉन्स्टेबल श्री आपा परब यांना आमंत्रण देऊन यांच्या बरोबर रक्षाबंधन साजरा केला.यावेळी मुलींनी त्यांना ओवाळून आपण स्वतः तयार करून आणलेल्या राख्या त्यांना बांधल्या.यावेळी त्यांनी मुलांना मार्गदर्शन करताना कोणत्याही वाईट मार्गाला न लागता शिकून मोठे व्हा असे सांगितले.आपण सुद्धा याच शाळेत शिकून मोठे झालो तसे तुम्ही सर्वांनी व्हा असे सांगितले.यावेळी त्यांनी मुलांना मिठाई दिली.
यावेळी मुलांनी रक्षाबंधनाच्या सणाचे औचित्य साधून शाळेतील बागेत असलेली निरनिराळी झाडे यांना सुद्धा आपण स्वतः टाकाऊ पासून टिकाऊ या पासून तयार करण्यात आलेल्या राख्या बांधल्या. व त्यांचे सुद्धा रक्षण करून ती शुद्धा आपले रक्षण करतात.याचे भान ठेऊन रक्षाबंधन साजरा केला.
यावेळी कार्यक्रमाला शा.व्य. समितीचे अध्यक्ष सोनाली वेंगुर्लेकर उपाध्यक्ष श्री भीमा देवजी शाळा प्रमुख सौ यशश्री नाईक उपस्थित होत्या.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळा प्रमुख सौ यशश्री नाईक यांनी केले तर आभार प्रदर्शन शिक्षिका सोनाली हरमलकर यांनी केले.