म्हापसा येथील आनंद निकेतन संस्था या विशेष मुलांच्या शाळेमध्ये सम्राट क्लब म्हापसा तफै देश प्रथम सप्ताह मध्ये चित्र काढण्याचा उपक्रम राबविण्यात आला. स्किबलिंग श्रेणी या स्पर्धेत आहिल शेख याला प्रथम क्रमांक मिळाला तर अधिराज दुपघाले व अनुप सैनी याना अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक मिळाला. हात रेखाटन स्पर्धेत अभिनव पल याने प्रथम क्रमांक पटकावला तर शौनक जलमी व ईशान नागवेकर यांनी द्धीतिय व तृतीय क्रमांक मिळवला समाट क्लब म्हापसा चे अध्यक्ष प्रकाश ताम्हणकर, यांनी देश प्रथम चे महव सांगितले तर प्रकल्प अधिकारी हरीश नासनोडकर, सत्य वसंत मोये यांनी काम पाहिले. प्रभारी शिक्षिका गीता विश्वकर्मा यांनी सुत्रसंचालन केले तर हरीश नासनोडकर यांनी आभार मानले