डिआजिओ इंडियाने गोव्यातील फोंडा येथील आपल्या अत्याधुनिक क्राफ्ट अॅण्ड इनोव्हेशन हबमध्ये केली 45 कोटी रुपयांची गुंतवणूक

.

*डिआजिओ इंडियाने गोव्यातील फोंडा येथील आपल्या अत्याधुनिक क्राफ्ट अॅण्ड इनोव्हेशन हबमध्ये केली 45 कोटी रुपयांची गुंतवणूक*

-गोव्याचे माननीय जल स्रोत विकास, सहकार आणि प्रोव्हेदोरिया मंत्री श्री. सुभाष शिरोडकर यांच्या हस्ते या क्राफ्ट अॅण्ड इनोव्हेशन हबचे उद्घाटन करण्यात आले

-या हबमध्ये दरमहा 20000 केसेस तयार केल्या जातील, यातून 250 स्थानिकांना रोजगार मिळेल आणि अल्को-बेव्ह स्टार्टअप परिसंस्थेलाही यातून सुरुवातीच्या काळातील साह्य मिळेल

-गोवा सरकारच्या कौशल्य विकास मोहिमेच्या साथीने कंपनीने 1000 तरुणांना पुढील तीन वर्षांत प्रशिक्षित करण्यासाठी रोजगारक्षम कौशल्य प्रशिक्षण उपक्रमही सुरू केला आहे

*गोवा, 16 ऑगस्ट 2022*: डिआजिओ इंडिया या देशातील आघाडीच्या बेव्हरेज अल्कोहोल कंपनीने आज गोव्यातील फोंडा येथील त्यांच्या अत्याधुनिक क्राफ्ट अॅण्ड इनोव्हेशन हबमध्ये 45 कोटी रुपयांची गुंतवणूक करत असल्याची घोषणा केली.

बदलांना चालना देणाऱ्या नाविन्यतेला वेग देणे आणि आपल्या क्राफ्ट आणि प्रीमिअम उत्पादनांना अधिक बळकटी देण्यासाठीच्या कंपनीच्या धोरणांनुसार ही गुंतवणूक करण्यात आली आहे. गोव्याचे माननीय जल स्रोत विकास, सहकार आणि प्रोव्हेदोरिया मंत्री श्री. सुभाष शिरोडकर यांनी या क्राफ्ट अॅण्ड इनोव्हेशन हबचे उद्घाटन केले.

या चार एकरांवर पसरलेल्या क्राफ्ट अॅण्ड इनोव्हेशन हबमध्ये दमदार आणि सर्व क्षमतांनी सज्ज सुविधा आहेत. यात मॉल्ट, जिन आणि रमसाठी डिस्टिलेशनची सुविधा, मॅच्युरेशनसाठीच्या सुविधा आणि मद्याच्या ब्लेंडिंगची सोय आहे. तसेच क्राफ्ट मद्यासाठी अॅटोमॅटिक बॉटलिंग आणि ब्लेंडिंगच्या क्षमता, कंपनीकडे येणाऱ्या आणि उत्पादन पूर्ण झालेल्या उत्पादनांसाठी गोदामांची सुविधाही इथे आहे. त्याचप्रमाणे इथे अभूतपूर्व असे कन्झ्युमर एक्सपिरिअन्स सेंटरही असणार आहे. दरमहा 20000 केसेस अशा आपल्या पूर्ण क्षमतेनिशी कार्यरत झाल्यानंतर या हबमध्ये 250 स्थानिकांना रोजगार मिळेल. धान्यापासून ग्लासापर्यंत शाश्वतता जपण्यावर भर देत दीर्घकालीन संशोधन तसेच भारतातील क्राफ्ट मद्याच्या परिसंस्थेला चालना देणे आणि गोव्याप्रती कायमस्वरुपी असलेली डिआजिओ इंडियाची बांधिलकी या गुंतवणुकीतून दिसून येते.

डिआजिओसोसायटी2030 : स्पिरिट ऑफ प्रोग्रेस आणि 10 वर्षांचा ईएसजी अॅक्शन प्लॅन या उपक्रमांना चालना देण्याच्या दृष्टीने या हबमध्ये डिस्टिलेशनसाठी 100 टक्के पुनर्वापरयोग्य ऊर्जेचा वापर करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे, 40 टक्क्यांहून अधिक कामकाजासाठी सौर पॅनल आणि वाफेच्या टर्बाइन्समधून कंपनीतच तयार होणाऱ्या पुनर्वापरयोग्य वीजेचा वापर केला जात आहे.

मागील दोन वर्षांत या डिस्टिलरीने विविध प्रकारचे जल संवर्धन, कामकाज पद्धतीतील सुधारणा आणि उपयुक्तता कार्यक्षमता पद्धती या माध्यमातून पाण्याचा सुयोग्य वापर करण्यात 45 टक्क्यांहून अधिक यश आले आहे.

सामाजिक बांधिलकी जपण्याच्या कंपनीच्या तत्वांनुसार डिआजिओ इंडियाने गोवा सरकारच्या कौशल्य विकास मोहिमेसोबत रोजगारक्षम कौशल्य प्रशिक्षक कार्यक्रमाची घोषणा केली आहे. या उपक्रमाअंतर्गत पुढील तीन वर्षांत 1000 स्थानिक युवकांना हॉस्पिटॅलिटी, पर्यटन आणि संबंधित क्षेत्रांमध्ये रोजगार/स्वयंरोजगारासाठी आवश्यक प्रशिक्षण दिले जाणार आहे. या क्षेत्रातील प्रोफेशनल्स आणि तज्ज्ञांतर्फे प्रशिक्षणार्थींच्या सर्वंकष विकासावर भर देणारे कौशल्याधारित 300 तासांहून अधिक प्रशिक्षण यात दिले जाईल. हे प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर वैयक्तिक कामगिरी आणि बाजारपेठेतील गरजा यानुसार त्यांना नोकरी किंवा उद्योगासाठी साह्य केले जाईल तसेच प्रशिक्षणार्थींना उद्योगक्षेत्र/सरकारमान्य प्रमाणपत्रही दिले जाईल.

डिआजिओ इंडियाच्या व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी हिना नागराजन म्हणाल्या, “गोव्यात क्राफ्टसाठी मोठी बाजारपेठ आहे. फाइन स्पिरिटचा अनुभव घेणाऱ्या ग्राहकांमध्ये भारतात आणि जगभरातच क्राफ्टची मागणी वेगाने वाढते आहे. आज गोव्यात क्राफ्ट अॅण्ड इनोव्हेशन हबचे उद्घाटन करून आम्ही या दिशेने आणखी एक महत्त्वाचे पाऊल टाकले आहे. स्थानिक पातळीवर आम्ही मिळवलेल्या माहितीच्या आधारे या सेंटरची उभारणी करण्यात आली आहे आणि यात नव्या पिढीतील ग्राहकांना आनंद मिळवून देण्यासाठी डिआजिओच्या तज्ज्ञतेची जोड देण्यात आली आहे. आमचे हे हब काही निवडक स्टार्ट अप्सना सुरुवातीच्या काळातील पाठबळ देऊ करेल, त्यांची उत्पादने सादर करण्यासाठी आम्ही त्यांना सुयोग्य सुविधाही पुरवणार आहोत. फक्त आमच्यासाठीच नाही तर संपूर्ण परिसंस्थेसाठी या हबमुळे अनेक नाविन्यपूर्ण शक्यता समोर येतील आणि आम्ही त्यासाठी उत्सुक आहोत.”

गोव्याचे माननीय जल स्रोत विकास, सहकार आणि प्रोव्हेदोरिया मंत्री श्री. सुभाष शिरोडकर यावेळी म्हणाले, “फोंडा येथे सुरू झालेल्या डिआजिओच्या क्राफ्ट अॅण्ड इनोव्हेशन हबबद्दल अभिनंदन! गोव्यातील 1000 स्थानिक युवकांना कौशल्य विकास आणि रोजगारक्षमतांनी सक्षम करण्याचे कंपनीचे प्रयत्न कौतुकास्पद आहेत. या तांत्रिकदृष्ट्या आधुनिक औद्योगिक प्रकल्पामुळे आयात केंद्र म्हणून गोव्यात असलेल्या क्षमता अधोरेखित झाल्या आहेत. डिआजिओ इंडियाला सर्वतोपरी साह्य करत असल्याचा राज्य सरकारला आनंद आहे.”

गोव्यात फोंडामध्ये कंपनीचे नाते 52 वर्षांपासूनचे आहे. 1970 मध्ये केसरवाल बेव्हरेजचे संपादन या कंपनीने केले. त्यानंतर त्याचे नामकरण मॅकडॉवेल्स अॅण्ड कंपनी लिमिटेड असे करण्यात आले. त्यानंतर युनायटेड स्पिरिट्स लिमिटेडने या कंपनीचे संपादन केले. कंपनीने नुकतेच गोवास्थित, उदयोन्मुख क्राफ्ट-जीन कंपनी नाओ स्पिरिट्स अॅण्ड बेव्हरेजेस प्रायव्हेट लिमिटेडमधील काही धोरणात्मक समभागांचे संपादन केले आहे. ‘हापूसा’ आणि ’ग्रेटर दॅन’ या पुरस्कारविजेत्या ब्रँड्सची निर्मिती नाओने केली आहे. गोव्याच्या आर्थिक आणि सामाजिक उद्दिष्टांमधील डिआजिओ इंडियाचा सहभाग या हबमुळे अधिक बळकट होणार आहे. त्याचप्रमाणे त्यांच्या ख्यातनाम ब्रँड्सच्या जगभरातील निर्यातीचे ते प्रमुख केंद्र असेल.

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar