प्रबोधन प्राथमिक विद्यालय पोबूंरफा येथे वृक्षारोपण
पोंबुर्फा येथील प्रबोधन प्राथमिक विद्यालयात औषधी वनस्पती, त्यांचे उपयोग व ओळख असे सत्र विद्यार्थ्यांसाठी घेण्यात आले. वरील सत्र सौ नीता रायकर यांनी घेतले. सत्रात त्यांनी विद्यार्थ्यांना औषधी वनस्पती दाखवल्या व त्यांची माहिती करून दिली. सुपारी, हळद, पुनर्नवा, लाजाळू,( लाजवंती ) चिराईत, (किरायते), टाकळा, सदाफुली ,पानवेल, गवती चहा, अजमोदा (ओवा) अशा औषधी वनस्पती विद्यार्थ्यांना दाखवण्यात आल्या. प्रत्येक वनस्पतींचा औषधी उपयोग विद्यार्थ्यांना सांगण्यात आला. तसेच ती वनस्पती कधी वापरावी, किती प्रमाणात वापरावी हे विद्यार्थ्यांना सांगण्यात आले. आपल्या आजूबाजूच्या परिसरात वेगवेगळी वेगवेगळी झाडे, वनस्पती असतात पण त्या झाडांपैकी कोणत्या झाडात, वनस्पतीत औषधी गुणधर्म आहेत कळावे यासाठी हा उपक्रम घेण्यात आला होता. वनस्पतींची ओळख सांगून झाल्यानंतर विद्यार्थ्यांनी, शिक्षकांनी, पाहुणे व पालक सर्वांनी मिळून शाळेजवळील बागेत वृक्षारोपण केले. अशाप्रकारे शाळेत औषधी वनस्पतींची छोटी बाग तयार करण्यात आली. या कार्यक्रमाला सनातन संस्थेच्या श्रीमती संगीता नाईक, सौ नीता रायकर, श्री. नंदकुमार रायकर, पालक, विद्यार्थी व शिक्षिका उपस्थित होत्या. शिक्षिका सौ. सुनंदा परब यांनी स्वागत केले तसेच शिक्षिका सौ. स्वेजा मांद्रेकर यांनी उपस्थितांचे आभार मानले सर्वांना खाऊ दिल्यावर कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
प्रबोधन प्राथमिक विद्यालय पोबूंरफा येथे वृक्षारोपण
.
[ays_slider id=1]