थिवी दि. १६ (वार्ताहर)
वृंदावन नर्सिंग कॉलेजच्या मशाल मिरवणूकीचा नीलकंठ हळणकर यांच्या हस्ते शुभारंभ.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त कोलवाळ बार्देश येथील वृंदावन इन्स्टीट्यूट ऑफ नर्सिंग एज्युकेशन तर्फे सोमवार दि. १५ ऑगष्ट रोजी सकाळी सहा वाजता मशाल मिरवणूकीचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी थिवी मतदार संघाचे आमदार तथा मच्छिमार मंत्री निळकंठ हळणकर प्रमुख पाहूणे म्हणून उपस्थित होते. निळकंठ हळणकर यांनी सर्वप्रथम मशाल पेटऊन मिरवणूकिची सुरवात केली. या वेळी कॉलेजचे अॅडमिनिस्ट्रेटर प्रा. सुभाष कौठणकर, प्राचार्य प्रा. एस. राजेश्वरी , पॅरामेडिकल टॅक्नोलॉजीच्या प्राचार्य रामेश्वरी, उपस्थित होते. मशाल मिरवणूकीस कॉलेजच्या आवारातून सुरवात करा करून ती कोलवाळे येथील श्रीराम मंदिराकडून, कोणिवाड्यावरून परत कॉलेज मध्ये आली. मिरवाणुकीत स्वतः मंत्री निळकंठ हळणकर प्रा. सुभाष कौठणकर, प्रा. एस. राजेश्वरी, प्रा. रामेश्वरी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच 200 विद्यार्थी सहभागी झाले होते, हातात मशाल व तिरंगा घेऊन फेरीत भाग घेतला होता सकाळच्या वेळी विद्यार्थी व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी “भारत माता कि जय” “वंदे मातरम या सारख्या घोषणा देत परिसर दुमदुमून सोडला,