थिवी दि. १६ (वार्ताहर)
फाज हाऊसिंग एसोसिएशन तर्फे मशाल मिरवणूक
भारताच्या स्वतंत्र्य दिनाची ७५ वर्षे पूर्ण होत असल्याचा आनंद साजरा करण्यासाठी माडेल थिवी येथील फाज हाऊसिंग कॉलनीच्या रहिवाश्यांतर्फे दि.१४ ऑगष्ट रोजी संध्याकाळी ७.३० वा मशाल मिरवणूक काढली. मशाल मिरवणूक फाज हाऊसिंग कॉलनीतून सुरु करून माडेल थिवी गावात फिरून आली. या वेळी भारत माता कि जय” “वंदे मातरम “अशा प्रकारचे नारे देत सगळ्या परिसरात उल्हासाचे वातावरण तयार केले. कॉलनीचे अध्यक्ष रामेश्वर कुबल यांच्या नेतृत्वाखाली आयोजीत केलेल्या या मशाल मिरवणुकीत कॉलनीतील मुले तसेच अबालवृद्ध मोठ्या संखेने सहभागी ‘झाले