भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त पेडणे तालुक्यातील सरकारी प्राथमिक विद्यालय मडकई, वजरी शाळेतील विद्यार्थ्यांनी डोळे दिपवून टाकणारी प्रभात फेरी काढली. प्रत्येक चिमुकल्या विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या क्रांतीकाऱ्यांची वेशभूषा या वेळी साकारली होती . देऊळवाडा ते मडकई वाड्यापर्यंत ही फेरी काढण्यात आली. या प्रभात फेरीदरम्यान विद्यार्थ्यांमध्ये तसेच शिक्षक व पालकांमध्येही उत्साहाचे वातावरण होते. सदर कार्यक्रमास गावच्या नवनिर्वाचित पंच सदस्या श्रीमती रुपम कांबळी या प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होत्या. मुलांनी तसेच पालकांनी मिळून देशाच्या स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल 75 अंकाची प्रतिकृती साकारली. कार्यक्रमाच्या शेवटी शाळेचे शिक्षक श्री. अनुप गावकर यांनी सर्वांचे आभार मानले.