सम्राट क्लब म्हापसातर्फे कर्नल नितीन रिवणकर यांचा सत्कार

.

सम्राट क्लब म्हापसातर्फे कर्नल नितीन रिवणकर यांचा सत्कार
म्हापसा दि १८(प्रतिनिधी ):-सम्राट क्लब म्हापसा यांनी सारस्वत विद्यालय शिदोरा काकुलो महाविद्यालय यांच्या सहकार्याने माजी कर्नल नितीन रिवणकर यांचा प्रिन्सिपल डॉ. संतोष पाटकर यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह देऊन भारताच्या अमृत महोत्सवाचे औचित्त साधून सत्कार करण्यात आला.
यावेळी व्यासपीठावर सम्राट क्लब म्हापसाचे अध्यक्षसम्राट प्रकाश ताम्हणकर,सचिव सम्राट अभय हजारे, खजिनदार सम्राट अमीन खान, प्रकल्प अधिकारी सम्राट विनोद सांगोल्डकर, माजी अध्यक्ष सम्राट दिगंबर रायकर, सौ. रिवणकर, तसेच सम्राट अँड. दीपक तिळवी,सम्राट हरिष नास्नोडकर, सम्राट प्रकाश धुमाळ, सम्राट नितीन नेवगी,सम्राट सत्यजित हिरवे, सम्राट चंद्रकांत आमोणकर आदी उपस्थित होते.
सत्कारमूर्ती कर्नल नितीन रिवणकर यांनी बोलताना सांगितले की, ज्यावेळी आपण आर्मीत नोकरी पटकर्ली त्यावेळी आपल्या डोळ्यासमोर एकच ध्येय होत. ते म्हणजे देशाचे रक्षण करणे हे आपले पाहिले कर्तव्य आहे. आपण देशात अनेक ठिकाणीच्या जंगलात व इतर ठिकाणी जाऊन लढ्यात भाग घेतला. आम्ही कुटुंब, घर संसाराकडे लक्ष दिले नाही पण प्रामाणिकपणे देश सेवा केल्याचे ते म्हणाले.
तर प्रमुख पाहुणे या नात्याने बोलताना प्रिन्सिपल डॉ. संतोष पाटकर म्हणाले की, भारताच्या स्वतंत्र लढ्यासाठी अनेकांनी आपली आहुती दिली. अनेकांनी आपला घरसंसार सोडून पुर्तुगीजाच्या हातून देशाचे सवर्षण करून घेण्यासाठी आपले रक्त आठवले. आपल्या देशाच्या सवर्षणासाठी कर्नल नितीन रिवणकर सारख्या लोकांनी आपले कार्य चालूच ठेवल्याने आज आम्हांला चांगले दिवस पाहायला मिळतात. असे प्रतिपादन डॉ. पाटकर यांनी केले.
यावेळी मान्यवरांच्या हस्ते म्हापसा, सुकूर, धारगळ व इतर ठिकाणी शाळा व इतर लोकांसाठी घेतलेल्या योगा विध्यार्थासाठी वक्तृत्व व देशभक्ती स्पर्धा घेण्यात आल्या त्यांना प्रशस्ती पत्रके व स्मृती चिन्हे देऊन गौवरविण्यात आले. प्रारंभी अध्यक्ष सम्राट प्रकाश ताम्हणकर यांनी स्वागत, व प्रास्ताविक भाषण केले. पाहुण्याची ओळख सम्राट विनोद सांगोल्डकर, सूत्रसंचालन सम्राट सत्यजित हिरवे तर आभार सचिव सम्राट अभय हजारे यांनी मानले.
फोटो :-माजी कर्नल नितीन रिवणकर, डॉ. संतोष पाटकर, सम्राट क्लब म्हापसाच्या पदाधिकाऱ्यांसमवेत विजेते स्पर्धक.

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar