केरीत दहीहंडी उत्साहात
केरी पेडणे येथे न्यु इंग्लिश हायस्कुलमध्ये गोकुळाष्टमीनिमित्त दहीहंडी कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. पूर्व प्राथमिक, प्राथमिक आणि हायस्कुलच्या मुलांनी यात उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. यानिमित्ताने लहान मुलांसाठी हंडी फोडण्याची स्पर्धा घेतली गेली. हायस्कुलच्या मुलांसाठी मानवी मनोरा करून दहीहंडी फोडण्याची स्पर्धा घेण्यात आली. त्यात रेड हाऊस पहिले तर ब्लु हाऊस दुसरे आले.
कार्यक्रम संयोजिका म्हणून शिक्षिका शर्मिला नाईक यांनी काम पाहिके तर सलोनी हर्जी, निकिता मठकर, यशवंत पेडणेकर, गुरुप्रसाद तांडेल,नीलम महालदार, आल्फ्रेड रोड्रिगीज, जेफरीन रोड्रिगीज, शिवाजी नाईक, रितेश भाटलेकर, साईश गाड, महिमा चारी यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यास सहकार्य केले.