कुंभारजुव्याच्या आमदारांनी सरकारी शाळेत साजरी केली जन्माष्टमी

.

कुंभारजुव्याच्या आमदारांनी सरकारी शाळेत साजरी केली जन्माष्टमी
पणजी
कुंभारजुवेचे आमदार राजेश फळदेसाई यांनी करमळी येथील सरकारी प्राथमिक विद्यालयात जन्माष्टमी उत्सवाला आपली हजेरी लावली. यावेळी झालेल्या दही हंडी कार्यक्रमात तसेच पूजेलादेखील त्यांनी उपस्थिती लावली. यावेळी शाळेतील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी बोलताना श्री. फळदेसाई यांनी कृष्ण तसेच श्रीमद् भगवद्गीता यांचे महत्त्व विद्यार्थ्यांना कथन केेल. आपल्या मतदारसंघातील तसेच संपूर्ण गोव्यातील लोकांना त्यांनी जन्माष्टमीच्या शुभेच्छा दिल्या. सर्वांना भगवान कृष्ण आयुष्य, आरोग्य तसेच भरभराट देवो, अशी प्रार्थनादेखील त्यांनी केली.
गरजूंना आवश्यक असलेले साहाय्य तसेच आधार देण्याचे आश्‍वासन त्यांनी या प्रसंगी दिले.
सुनंदाबाई बांदोडकर हायस्कूलचे हेडमास्टर सुबोध महाले, माजी सरपंच व विद्यमान पंच कुष्टा सालेलकर, सरकारी शाळेच्या शिक्षिका निर्मला गावस, सुनंदाबाई बांदोडकर हायस्कूलच्या पालक शिक्षक संघाचे अध्यक्ष श्री.वरगावकर आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar