युवा आणि क्रीडा व्यवहार संचालनालय आयोजित टेबल टेनिस स्पर्धेच्या आंतर विभागीय पातळीवर उप विजेतेपद पटकावत हरमल पंचक्रोशी उच्च माध्यमिक विद्यालयाने राज्यस्तरीय स्पर्धेत प्रवेश

.
युवा आणि क्रीडा व्यवहार संचालनालय आयोजित टेबल टेनिस स्पर्धेच्या आंतर विभागीय पातळीवर उप विजेतेपद पटकावत हरमल पंचक्रोशी उच्च माध्यमिक विद्यालयाने राज्यस्तरीय स्पर्धेत प्रवेश केला आहे.
       यापूर्वी कर्णधार साहिल गावडे यांच्या नेतृत्वाखाली उगम किनळेकर, सोहम कवठणकर, कृष्णा भगत, योगेश गावडे या सर्व विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत विभागीय पातळीवर श्री शांतादुर्गा उच्च माध्यमिक विद्यालय पिर्ण , सेंट थॉमस उच्च माध्यमिक विद्यालय हळदोण, सरोजिनी मधुसूदन कुशे उच्च माध्यमिक विद्यालय म्हापसा यांचा प्रत्येकी 3-0 अशा सेटनी तर सेंट झेवियर उच्च माध्यमिक विद्यालय म्हापसाचा 3-2 अशा सेटने पराभव करत आंतर विभागीय पातळीवर प्रवेश केला.
             विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल हरमल पंचक्रोशी शिक्षण मंडळाचे अध्यक्ष लक्ष्मीकांत पार्सेकर, उच्च माध्यमिक विद्यालयाच्या व्यवस्थापिका स्मिता पार्सेकर, प्राचार्य गोविंदराज देसाई, पालक शिक्षक संघ तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन केले असून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar