माद्रे हायस्कूल मांद्रे प्राथमिक विभाग दहीहंडीचा कार्यक्रम गुरुवार, दिनांक १८ ऑगस्ट रोजी मोठ्या उत्साहात साजरामांद्रे

.

माद्रे हायस्कूल मांद्रे प्राथमिक विभाग दहीहंडीचा कार्यक्रम गुरुवार, दिनांक १८ ऑगस्ट रोजी मोठ्या उत्साहात साजरामांद्रे करण्यात आला. कार्यक्रमासाठी मांद्रे हायस्कूल शाळेच्या व्यवस्थापन समितीच्या सदस्या सौ. शैलेजा किनळेकर, शाळेचे मुख्याध्यापक विवेक बोडके उपस्थित होते.
या कार्यक्रमानिमित्त पूर्व प्राथमिकच्या विद्यार्थ्यांसाठी वेशभूषा स्पर्धा आयोजित केली होती. तसेच प्राथमिक विभागातील इयत्ता पहिली आणि दुसरीचे विद्यार्थी श्रीकृष्णाच्या व राधेच्या वेशभूषेमध्ये अवतरले होते.पालक ही मोठ्या प्रमाणात हजर होते. जन्माष्टमी गाण्यांच्या तालावर पूर्व प्राथमिकच्या विद्यार्थिनींनी नृत्य सादर करून कार्यक्रमाची शोभा वाढवली.
प्राथमिक विभागाचे शिक्षक दिनेश गोसावी आणि हायस्कूल शिक्षिका कीर्ती गडेकर यांनी स्पर्धेचे परीक्षण केले. विजेत्यांना बक्षीस देऊन त्यांचं अभिनंदन करण्यात आले.
नंतर इयत्ता तिसरी व चौथीच्या विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धा खेळत दहीहंडी फोडल्या व या उत्साहाचा आनंद अनुभवला.
प्रमुख पाहुण्या शैलेजा किनळेकर यांनी मुलांना थोडक्यात या दिवसाचे मार्गदर्शन केले.
कार्यक्रमासाठी पालकवर्ग, पूर्व प्राथमिक आणि प्राथमिक विभागाच्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. सूत्रसंचालन शिक्षिका सौ. श्रुती सावंत तर आभार शिक्षिका अमिशा गोवेकर हिने व्यक्त केले

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar