विज्ञान समजून घेण्यासाठी प्रत्येकाला प्रश्न पडायला हवे : गोवा सायन्स फोरमचे अध्यक्ष सोमु राव केरीत सायंटिफिक टेम्पर

.

विज्ञान समजून घेण्यासाठी प्रत्येकाला प्रश्न पडायला हवे
: गोवा सायन्स फोरमचे अध्यक्ष सोमु राव

केरीत सायंटिफिक टेम्पर या विषयी आयोजित कार्यशाळेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

विश्वात होणाऱ्या प्रत्येक गोष्टी मागे विज्ञान असते. ते विज्ञान समजून घेण्यासाठी प्रत्येकाला प्रश्न पडणे आवश्यक आहे. प्रश्न पडणे हे प्रत्येकाचे जिवंतपणाचे लक्षण आहे. ज्याच्याकडे प्रश्न आहेत आणि त्या प्रश्नांची कशी उत्तरे शिधायचे हे ज्याला समजले त्याचे भविष्य उज्जल आहे असे प्रतिपादन गोवा विज्ञान फोरमचे अध्यक्ष सोमू राव यांनी केरी पेडणे येथे केले .

न्यू इंग्लिश हायस्कुल, केरीच्या सभागृहात शालेय विद्यार्थ्यांसाठी साइंटिफिक टेम्पर या विषयावर आयोजित कार्यशाळेचे प्रमुख वक्ते या नात्याने राव व्यासपीठावरून बोलत होते.

पुढे राव म्हणाले की, या जगात अनैसर्गिक शक्ती असे काही नसते. या जगात फक्त नैसर्गिक शक्ती आहेत म्हणून विद्यार्थ्यांनी स्वतः मध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करण्याची गरज आहे.

गोवा विज्ञान फोरम यांच्या तर्फे न्यु इंग्लिश हायस्कुल केरी येथे आयोजित करण्यात केलेल्या कार्यशाळेत ते बोलत होते .

यावेळी व्यासपीठावर राव यांच्यासोबत जयंत सामंत, उदय नागवेकर व मुख्याध्यापक भावार्थ मांद्रेकर उपस्थित होते.

या कार्यशाळेत वैज्ञानिक दृष्टीकोन , तसेच विज्ञानाचे प्रयोग करून अंधश्रद्धाळूपणा आणि अज्ञानामुळे लोक कशा पद्धतीने भोंदूसाधुंच्या बाताना बळी पडतात. या विषयी त्यांनी प्रत्यक्ष प्रयोग सादर करून विद्यार्थात जागृती केली.

कार्यक्रमाच्या प्रारंभी भावार्थ मांद्रेकर यांनी स्वागत व मान्यवरांचा परिचय केला. तर शेवटी आल्फ्रेड रॉड्रिगीज यांनी आभार मानले.

 

कार्यशाळेत उत्स्फूर्तपणे सहभागी झालेली केरीतील मुले.

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें