मातीशी नाते जोडणाऱ्या संस्कृतीचा केरीतील मुलांनी घेतला अनुभव

.

मातीशी नाते जोडणाऱ्या संस्कृतीचा केरीतील मुलांनी घेतला अनुभव


*न्यू इंग्लिश प्राथमिक विद्यालय केरीच्या मुलांची नेहा आर्ट्स अँड पॉटरी स्टुडिओला भेट*

केरी पेडणे येथील न्यू इंग्लिश प्राथमिक विद्यालयाच्या मुलांनी पालये येथील नेहा आर्ट्स अँड पोटरी स्टुडिओला आज भेट दिली. आपली संस्कृती ही मातीशी नाते सांगणारी संस्कृती आहे. विद्यान तंत्रज्ञानाच्या जगात आजची मुले मातीशी असलेले आपले नाते विसरत चालली आहेत. त्यांना मातीशी जोडण्याच्या उद्देशाने आणि आपल्या सांस्कृतिक वारस्याची श्रीमंती समजून घेण्याचा उद्देशाने शाळेने या विशेष अभ्यास सहलीचे आयोजन केले होते.

यावेळी मुलांनी माती पासून विविध भांडी वस्तू व मूर्ती कशी तयार करतात हे प्रत्यक्ष अनुभवले. प्राचीन काळात ज्या वस्तू वापरण्यात येत होत्या त्यांचे प्रदर्शन पाहिले. स्टुडिओतर्फे मळलेली माती चक्रावर ठेवून त्या वस्तूला आकार कसा देतात हे दाखवले त्यानंतर तयार केलेल्या वस्तू भट्टीत भाजून त्यावर कशी प्रक्रिया केली जाते हेही यावेळी मुलांनी अनुभवले.

पहिली ते चौथीची मुले या उपक्रमात मोठ्या उत्साहाने सहभागी झाली. निसर्गाच्या सानिध्यात मुलांनी आपला वेळ मजेत घालवला. त्यावेळी शाळेच्या शिक्षिका सलोनी हर्जी, दीक्षा माणगावकर, रेश्मा परब, सोनाली वस्त, महिमा चारी, नम्रता आजगावकर उपस्थित होत्या .

फोटो
केरी पेडणे येथील न्यू इंग्लिश प्राथमिक शाळेच्या मुलांची कुंभरकामाची माहिती करून देताना मार्गदर्शक.

 

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar