मुलांमध्ये असलेली कला विकसित करण्यासाठी माडेल थिवी येथील सरस्वती वाचनालयातर्फे चिकणमाती पासून गणेश मूर्ती बनविण्याची स्पर्धा फाज हाऊसिंग काॅलनीचा सभागृहात आयोजित केली होती. 

यात एकूण २१ स्पर्धेकानी भाग घेऊन दोन तासाच्या अवधित सुंदर मूर्ती साकारल्या होत्या. मूर्तीकार दत्ताराम कांबळी यांनी या स्पर्धेचे परीक्षण केले
यात पहिले बक्षीस सहाना अब्बूनवर, दूसरे बक्षीस दिया धुरी, तर तिसरे बक्षीस सिद्धी बेकनाळकर, याना देण्यात आले. उत्तेजनार्थ पहिले बक्षीस कविष चिपकर, तर दुसरे उत्तेजनार्थ बक्षीस वेदांत शिरोडकर याना देण्यात आले. बक्षीस वितरण समारंभाला प्रमुख पाहुणे दत्ताराम कांबळी सरस्वती वाचनालय येथे अध्यक्ष प्रा. सुभाष कौठणकर, उपाध्यक्ष शिरीष देसाई, रामेश्वर कुबल, संचालक मोहन देशपांडे, तसेच ग्रंथपाल तेजा कामत, उपस्थित होते. सुभाष कौठणकर यांनी स्वागत व परीक्षकांनी ओळख करून दिली. तेजा कामत यांनी सुत्र संचालन केले तर रामेश्वर कुबल यांनी आभार मानले.