अभिनव कलामंदिर तफै माडेल थिवी येथील हाऊसिंग बोर्ड येथे गायन वर्ग
सुरू

थिवी नवा
कलाक्षेत्रात कार्यक्रम असलेल्या फोंडा येथील अभिनव कलामंदिर यांनी एक पाऊल पुढे घेत माडेल थिवी येथील हाऊसिंग बोर्ड च्या सभागृहात संगीत विधालय वर्गाची सुरूवात केली आहे. या विधालयाचे विधिवत उदघाटन प्रसिद्ध हृदय रोग तज्ञ तथा तबलावादक डॉ. राजेश भटकुसै यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले. यावेळी अभिनव कला मंदिरचे उपाध्यक्ष नितीन ढवळीकर, वर्ग प्रमुख संगीत शिक्षक किरण रायकर, प्रा सुभाष कौठणकर, विश्राम पालयेकर, शेखर नागडे, उपस्थित होते. विल्वदल संस्थेतर्फे साखळी रवींद्र भवन मध्ये आयोजित केलेल्या सविनय नाटय़ गीत प्रथम क्रमांक चे बक्षीस मिळवलेल्या ऋषीकेश ढवळीकर तसेच दुसरे बक्षीस प्राप्त केलेली साक्षी देसाई यांचा यावेळी डॉ. राजेश भटकुसै यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. त्यानंतर ऋषीकेश ढवळीकर व साक्षी यांनी नाटयगीते व अभंग सादर केले. त्याना तबला साथ शरद पाळणी, तर सृजन भटकुसै यांनी हार्मोनियम साथ केली. या संगीत विधालयात प्रवेश घेण्यासाठी किरण रायकर ८३०८८३८१३८ यांच्याशी संपर्क साधा वा.