हरमल येथील आधार मल्टिपपर्ज कोऑपरेटिव्ह सोसायटी ची आमसभा पतसंस्थेचे अध्यक्ष पांडुरंग पिंगे यांच्या अध्यक्षतेखाली हरमल पंचायत सभागृहात पार

.
हरमल येथील आधार मल्टिपपर्ज कोऑपरेटिव्ह सोसायटी ची आमसभा पतसंस्थेचे अध्यक्ष पांडुरंग पिंगे यांच्या अध्यक्षतेखाली हरमल पंचायत सभागृहात पार पडली.
आधार मल्टिपपर्ज कोऑपरेटिव्ह पतसंस्थेचे संचालक श्रीधर गावडे यांनी स्वागत केले. व्यवस्थापक अर्जुन खबै यांनी मागील आमसभेचा वृत्तात वाचून दाखवला. पतसंस्थेचे अध्यक्ष पांडूरंग पिंगे यानी हिशेब तपासणीचा अहवाल सादर केला. पतसंस्था सध्या ग्राहकांना वीज बिले, टेलीफोन बिल, टिव्ही रिचार्ज, कृषी विषयक सुविधा, गाड्यांचा विमा, आदि सुविधा पुरविते असे संयोजक सुजय गोकर्णकर यांनी सांगितले. पतसंस्थेचे सल्लागार ॲड. प्रसाद शहापूर कर यांनी आगामी काळात पतसंस्थेची वाटचाल कशी असावी याविषयी मार्गदर्शन करून आपण सर्व तरेची सहकार्य करू असे सांगितले. संस्थेचे उपाध्यक्ष सुदेश तारी आणि संचालक अनंत गडेकर यांनी विचार मांडले. संचालक आत्माजी नाईक यांनी आभार मानले. भागधारकांचा समस्या व सुचना संचालक मंडळाने आदर ठेवून त्या सोडविण्याची हमी दिली

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar