ओलाकडून आधुनिक मूव्‍हओएस वैशिष्‍ट्यांनी युक्‍त नवीन एस१ लॉन्‍च; किंमत ९९,९९९ रूपये

.

*ओलाकडून आधुनिक मूव्‍हओएस वैशिष्‍ट्यांनी युक्‍त नवीन एस१ लॉन्‍च; किंमत ९९,९९९ रूपये*

मर्यादित ‘फ्रीडम एडिशन’ एस१ प्रोसाठी आणले असून ते ‘खाकी’ रंगात उपलब्ध आहे.
India, २०२२: ओला इलेक्ट्रिक या भारताच्या सर्वांत मोठ्या इलेक्ट्रिक वाहन कंपनीने आज नव्याकोऱ्या ओला एस१ स्कूटरच्या अनावरणाची घोषणा उत्तम डिझाइन, उत्तम कामगिरी, वर्गातील सर्वोत्तम वैशिष्टे आणि नवीन युगातील कनेक्टेड तंत्रज्ञानासोबत केली आहे. त्यामुळे ही या वर्गातील सर्वाधिक अद्ययावत स्कूटर ठरली आहे.

नवीन ३ किलोवॅट लिथियम आयन बॅटरी पॅकने युक्त ओला एस१ 141 किमी एआरएआय प्रमाणित रेंज, नॉर्मल मोडमध्‍ये १०१ किमी अस्‍सल रेंज, इको मोडमध्‍ये १२८ किमी आणि स्‍पोर्टस् मोडमध्‍ये ९० किमी रेंज देते. ओला एस१ मध्‍ये म्युझिक प्लेबॅक, नेव्हिगेशन, कंपॅनियन अॅप आणि रिव्हर्स मोड यांसारखी काही अत्यंत लोकप्रिय मूव्हओएस वैशिष्ट्ये देखील आहेत. तिचा ताशी ९५ किमीचा सर्वोच्च वेग या स्कूटरला सर्वांधिक वेगवान स्कूटर्सपैकी एक बनवतो. पोर्सेलिन व्हाइट, जेट ब्लॅक, निओ मिंट, कोरल ग्लॅम आणि लिक्विड सिल्व्हर या रंगांत उपलब्ध असलेली एस १ ही गाडी ₹ ९९,९९९ किंमतीत आणण्यात आली आहे.

नवीन ओला एस१ लवकर मिळवण्यासाठी आरक्षण आजपासून फक्त ४९९ रूपयांत सुरू होत आहे. गाडी लवकर मिळणाऱ्या ग्राहकांना अंतिम पेमेंट १ सप्टेंबर रोजी करता येईल तर इतरांसाठी पूर्ण पेमेंट विंडो २ सप्टेंबरपासून खुली होईल. ग्राहक ओला अॅपमधून त्यांची ओला एस१ थेट आरक्षित करू शकतात आणि ५ फायनान्स भागीदारांनी दिलेल्या किंवा कोणत्याही ऑफलाइन बँकिंग किंवा वित्तीय संस्थेकडून किंवा अगदी रोख स्वरूपात वित्तपुरवठ्याचे पर्याय मिळवू शकतात. ओला एस१ साठी ईएमआय २,९९९ रूपयांना सुरू होतो आणि प्रक्रिया शुल्क माफ केल्यामुळे ग्राहकांना आता आपल्या आवडीची ईव्ही सहजपणे खरेदी करता येईल. ओला एस१ साठी डोअरस्टेप डिलिव्हरी ७ सप्टेंबरपासून संपूर्ण भारतभरात सुरू होईल.

ग्राहक आता ओला एक्‍स्‍टेण्‍डेड वॉरण्‍टीसह त्‍यांची वॉरण्‍टी जवळपास ५ वर्षांपर्यंत वाढवू शकतात, ज्‍यामध्‍ये त्‍यांच्‍या वेईकलची बॅटरी, मोटर, इलेक्ट्रिकल घटक आणि इतर सर्व प्रमाणित पार्ट्ससाठी संरक्षण दिले जाईल. स्‍कूटर यापूर्वीच खरेदी केलेले ग्राहक देखील ओला अॅपवर पर्यायी अॅड-ऑन म्‍हणून ही वॉरंटी खरेदी करू शकतात.

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar