आयडीबीआय बँकेने किरकोळ मुदत ठेवींवरील व्याज दर (रिटेल टर्म डिपॉझिट) ६.७०% पर्यंत वाढवले
आयडीबीआय बँकेने मुदत ठेवींवरील व्याज दरांमध्ये वाढ केली आहे. २२ ऑगस्ट २०२२ पासून आयडीबीआय बँकेच्या विविध मुदतींच्या मुदत ठेवींवरील व्याज दरांमध्ये वाढ होणार आहे. निवडक मुदतींवर ६.५५% इतका सर्वात जास्त व्याज दर ही बँक आता देणार आहे. अमृत महोत्सव एफडी योजनेंतर्गत या बँकेने ५०० दिवसांची विशेष ठेव योजना देखील मर्यादित दिवसांसाठी सुरु केली आहे, यामध्ये सर्वात जास्त ६.७०% इतका व्याज दर दिला जाणार आहे. अमृत महोत्सव ऑफर मर्यादित कालावधीसाठी ३० सप्टेंबर २०२२ पर्यंत लागू असणार आहे.
याशिवाय, यूएस डॉलर डेसिग्नेटेड एफसीएनआर (बी) ठेवींसाठी सर्वात जास्त ३.६३% दराने ५०० दिवसांचे एक विशेष बकेट देखील बँकेने सादर केले आहे.
आयडीबीआय बँकेने किरकोळ मुदत ठेवींवरील व्याज दर (रिटेल टर्म डिपॉझिट) ६.७०% पर्यंत वाढवले

.
[ays_slider id=1]