विद्यार्थ्यांनी जीवन कौशल्ये आत्मसात करावीत- पार्सेकर

.

: विद्यार्थ्यांनी जीवन कौशल्ये आत्मसात करावीत- पार्सेकर
रेड रिबन क्लब चा विद्यार्थी प्रबोधनाचा मार्ग अतिशय स्तुत्य आहे. या अंतर्गत आयोजित मार्गदर्शन शिबिरातून विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या विषयांची व जीवन कौशल्यांची माहिती प्राप्त होते. त्या माहितीचा उपयोग विद्यार्थ्यांनी स्वतःच्या विकासासाठी करावाच त्याबरोबरच त्यांनी आपापल्या भागातील लोकांनाही ही माहिती देऊन समाज प्रबोधनाचे कार्य करावे असे उद्गार हरमल पंचक्रोशी शिक्षण मंडळाचे अध्यक्ष व माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी काढले. ते हरमल पंचक्रोशी उच्च माध्यमिक विद्यालयात रेड रिबन क्लब च्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर तुयेच्या सामाजिक आरोग्य केंद्रातील डॉ. सिद्धेश परब, प्राचार्य गोविंदराज देसाई, रेड रिबन क्लबचे समन्वयक शशिधर हळणकर तसेच स्वयंसेवक कु. देवेश तिळवे उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्राचार्य गोविंदराज देसाई यांनी सर्वांचे स्वागत केले. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन झाले. यानंतर हरमल पंचक्रोशी शिक्षण मंडळाचे चेअरमन व माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी उपस्थित असताना मार्गदर्शन केले. रेड रिबन क्लबचे समन्वयक शशिधर हळणकर यांनी यावेळी रेड रेबन क्लबच्या स्वयंसेवकांना शप: तदनंतर प्रमुख पाहुणे डॉ. सिद्धेश परब यांनी उपस्थितांना ‘एच्आयव्ही आणि एड्स’ या विषयावर संगणकीय सादरीकरणाद्वारे उपयुक्त माहिती दिली. यानंतर झालेल्या प्रश्नोत्तर सत्रानंतर डॉ. सिद्धेश परब यांना स्मृतिचिन्ह देऊन गौरवण्यात आले.
कार्यक्रमाच्या अखेरीस कु. देवेश तिळवे यांनी उपस्थितांचे आभार मानले. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षिका सौ. श्रेया कासकर हिने केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ऋषभ कोलवेकर तसेच अन्य कर्मचारी वर्गाचे विशेष सहाय्य लाभले.

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें