गोपाळकृष्ण शाळेत जन्माष्टमी साजरी

.
गोपाळकृष्ण शाळेत जन्माष्टमी साजरी
 गोपाळकृष्ण शाळेत जन्माष्टमी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाला शाळेचे सचिव सर संजीव काणेकर यांनी आपली उपस्थिती लावली. कृष्णमूर्ती च्या पूजनाने व आरतीने कार्यक्रमाची सुरुवात झाली त्यानंतर विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. कृष्ण जन्माष्टमीच्या निमित्ताने पूर्व प्राथमिक आणि प्राथमिक विद्यार्थी यांची वेशभूषा स्पर्धा ठेवण्यात आली होती, रंगमंच पडदा विद्यार्थ्यांनी स्पर्धा घेतलेल्या चित्रांनी सजवण्यात आला.राधा व कृष्ण यांच्या वेशात आल्याने आपली कला सादर केली. यावेळी परीक्षक म्हणून शिक्षक सर शंकर आजरेकर, व समितीचे सदस्य सिद्धेश काणेकर आणि पालक सौ. रितीका शिरोडकर परीक्षक म्हणून लाभले होते. हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी ‘मैया यशोदा’ व ‘वो किसना है’ या गाण्यांवरनृत्य सादर केले. गोपाळकाल्याच्या निमित्ताने विविध स्पर्धा आयोजित करण्यात आल्या. यामध्ये श्री कृष्णाचा मुकुट तयार करणे, मुरली बनवणे, मटकी रंगवणे अशा प्रकारच्या विविध स्पर्धा सकाळी आयोजित केल्या होत्या त्याचप्रमाणे या सगळ्या स्पर्धांमध्ये मुलांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला. सांस्कृतिक कार्यक्रमांच्या समाप्तीनंतर उपस्थित पालक शिक्षक व सर्व विद्यार्थ्यांना प्रसाद देण्यात आला व आयोजित स्पर्धांचे निकाल त्याच वेळी जाहीर करण्यात आले. पारंपारिक विधीनुसार हंडी फोडण्याचा कार्यक्रम पार पाडण्यात आला. श्रीकृष्णाच्या रूपातल्यासगळ्या बाळगोपाळांनी हंडी फोडली आणि कार्यक्रमाची शोभा द्विगुणीत केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षिका साक्षी देसाई व कविता परब यांनी केले व आभार प्रदर्शन शिक्षिका दीपा शेट वेरेकर यांनी केले

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar