म्हापसा येथील ज्ञानदीप प्रतिष्ठान तफै वरीष्ठ नागरिकांसाठी आयोजित स्नेहमिलनाचा कार्यक्रम केरी येथील विजयादुर्गा मंदिरात पार पडला

.
म्हापसा येथील ज्ञानदीप प्रतिष्ठान तफै वरीष्ठ नागरिकांसाठी आयोजित स्नेहमिलनाचा कार्यक्रम केरी येथील विजयादुर्गा मंदिरात पार पडला.
या स्नेहमिलनाचा कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प. पू. मुकुंद बुवा मडगावकर उपस्थित होते. त्यांनी यावेळी सांगितले की ज्ञानदीप प्रतिष्ठान ही संस्था गेली सहा वर्षे जेष्ठ नागरिकांसाठी तिर्थस्थळाना घेऊन जाते व त्याचे श्रेय  ज्ञानदिप प्रतिष्ठान तीर्थाटनचा प्रमुख राखी पालेकर यांना जाते.
यावेळी व्यासपीठावर ज्ञानदीप प्रतिष्ठान चे अध्यक्ष भारत बेतकेकर, सचिव डॉ. सुशांत तांडेल, विश्वत विनय चोपडेकर, राखी पालेकर व गुरुमाऊली उपस्थित होत्या.
याप्रसंगी गेली सहा वर्षे सात्यत्याने तीर्थाटनला गेलेल्या जेष्ठ नागरिकचा मुकुंद बुवा मडगावकर यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. यावेळी जेष्ठ नागरिक भानुदास बेसरे, नरेश दाते, तुळशीदास परब, माधव बोडके, रोहिणी काकोडे, आरती पै, राजाराम खोबरेकर, शितल गायतोंडे, प्रकाश नावैकर, यांनी आपले प्रवासातील अनुभव कथन केले. ज्ञानदीप प्रतिष्ठान तर्फे आतापर्यंत ६००० हजाराहून अधिक लोकांना तीर्थाटनाच लाभ घेतला आहे. देश तसेच विदेशातील स्थळांना भेटी दिल्या आहेत. व हे यशस्वी रीत्या पार पाडलाबदल सर्वानी पालेकर यांचे कौतुक केले. ज्ञानदीप प्रतिष्ठान चे अध्यक्ष भारत बेतकेकर यांनी ज्ञानदीप प्रतिष्ठान च्या कार्याची ओळख करून दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ सुशांत तांडेल यांनी केले तर विनय चोपडेकर यांनी आभार मानले

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar