एनडीआर वेयरहाउसिंग प्रायव्हेट लिमिटेडतर्फे गोव्यात नवी सुविधा सुरू

.

एनडीआर वेयरहाउसिंग प्रायव्हेट लिमिटेडतर्फे गोव्यात नवी सुविधा सुरू

एनडीआर गोवा- स्पेसचे उद्घाटन, एनडीआर वेयरहाउसिंगचा गोव्यातील प्रमुख प्रकल्प
या सुविधेचे दूरसंचार पायाभूत सुविधा क्षेत्रातील जगातील आघाडीची कंपनी कॉमस्पेसला हस्तांतरण

गोवा, २४ ऑगस्ट २०२२ – देशांतर्गत जलमार्ग आणि कोस्टल शिपिंग क्षेत्रातील आघाडीची कंपनी एनडीआर वेयरहाउसिंगने आज एनडीआर गोवा- स्पेस या एनडीआर वेयरहाउसिंगच्या गोव्यातील प्रमुख प्रकल्पाचे उद्घाटन केले. त्यानंतर या सुविधेचे दूरसंचार पायाभूत सुविधा क्षेत्रातील जगातील आघाडीची कंपनी कॉमस्पेसला हस्तांतरण करण्यात आले.
ही वेर्णे या प्रमुख औद्योगिक क्षेत्रातील अत्याधुनिक कंपनी आहे. यामध्ये बांधकामाचे आधुनिक तंत्र, उर्जा बचत करणारे साहित्य यांचा वापर करण्यात आला असून विक्रमी वेळेत त्याचे काम पूर्ण करण्यात आले आहे.
१९८६ मध्ये स्थापन करण्यात आलेल्या एनडीआर वेयरहाउसिंग प्रा. लि. चे भारतातील उच्चभ्रू वेयरहाउसिंग कंपन्यांपैकी एका कंपनीत रुपांतर झाले असून त्यांच्यातर्फे असामान्य देशभरात परवडणाऱ्या किंमतीत दर्जेदार औद्योगिक व वितरण केंद्रे पुरवली जातात. कंपनीकडे सध्या १२ दशलक्ष चौरस फुट वेयरहाउसिंग जागा असून अतिरिक्त ४ दशलक्ष चौरस फुट जागा बांधकामाअंतर्गत आहे. कंपनीच्या ग्राहकांमध्ये फॉर्च्युन १०० कंपन्या, आघाडीच्या भारतीय कॉर्पोरेट कंपन्या, ई- कॉमर्स आणि थ्रीपीएल कंपन्यांचा समावेश आहे.
एनडीआर वेयरहाउसिंगचे व्यवस्थापकीय संचालक व्यवस्थापकीय संचालक अमृतेश रेड्डी म्हणाले, ‘लॉजिस्टिक्स भागीदार म्हणून कॉर्पोरेट्सची पहिली पसंती मिळवण्याचे आमचे ध्येय असून त्याचबरोबर भारताला उत्पादनाचे प्रमुख केंद्र बनवण्यात महत्त्वाची भूमिका बजावण्याचे उद्दिष्ट आम्ही ठेवले आहे. आम्हाला ग्राहकांच्या वैविध्यपूर्ण गरजांची जाण आहे आणि त्या प्रभावीपणे पुरवण्यासाठी आम्ही सक्षम आहोत.’

एनडीआर वेयरहाउसिंगविषयी
साठवणुकीच्या गरजा पूर्ण करण्यासाठी स्वच्छ व किफायतशीर सुविधा पुरवून १९८६ मध्ये शेतकऱ्यांनी एनडीआर वेयरहाउसिंग प्रा. लि. ची स्थापना केली होती. एनडीआर वेयरहाउसिंग प्रा. लि. चे आता भारतातील उच्चभ्रू वेयरहाउसिंग ब्रँडमध्ये रुपांतर झाले असून कंपनीद्वारे देशभरात परवडणाऱ्या किंमतीत दर्जेदार औद्योगिक व वितरण केंद्रे पुरवली जातात.
अधिक माहितीसाठी संपर्क

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar