पाइन लॅब्ज नाटेकर स्पोर्टस् अँड फिटनेसच्या सहयोगाने सुरू करत आहे सेकंड इनिंग्ज प्रोग्राम*

.

*पाइन लॅब्ज नाटेकर स्पोर्टस् अँड फिटनेसच्या सहयोगाने सुरू करत आहे सेकंड इनिंग्ज प्रोग्राम*

विविध क्रीडाक्षेत्रातील सहा माजी भारतीय खेळाडूंना केले सहभागी

India,2022: अग्रगण्य मर्चंट कॉमर्स ओम्नीचॅनल प्लॅटफॉर्म पाइन लॅब्जने आज आपल्या ‘सेकंड इनिंग्ज’ प्रोग्रामअंतर्गत सहा माजी भारतीय क्रीडापटूंना कंपनीमध्ये रुजू केल्याची घोषणा केली. भारतातील निवृत्त क्रीडापटूंचे पुन:कुशलन करण्यासाठी व त्यांना नोकरीच्या संधी देण्यासाठी हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. हा उपक्रम राबविण्यासाठी कंपनीने नाटेकर स्पोर्टस् अँड फिटनेस (एनएसएफ) या संस्थापक गौरव नाटेकर यांच्या नेतृत्वाखाली चालणा-या संस्थेशी सहयोग साधला आहे. गौरव नाटेकर हे भारताचे पहिल्या क्रमांकाचे, अर्जुन पुरस्कार विजेते, आशियाची खेळांमध्ये दोन सुवर्णपदकांचे मानकरी असलेले टेनिसपटू आहेत. भारताचे विख्यात बॅडमिंटन स्टार दिवंगत नंदू नाटेकर यांचे सुपुत्र आहेत.
कंपनीत रुजू झालेल्या प्रत्येक खेळाडूला पाइन लॅब्ज आणि एनएसएफ यांच्यातर्फे पाइन लॅब्ज संस्थेमध्ये सुयोग्य काम दिले जाईल व त्यासाठी आवश्यक कौशल्य विकास प्रशिक्षणही पुरविण्यात येईल. कंपनीत नव्याने रुजू झालेल्या या खेळाडूंना विद्यमान कर्मचा-यांसारख्याच सुविधा मिळतील व ते पाइन लॅब्जच्या वार्षिक आढाव्याचाही भाग असतील.
या उपक्रमाविषयी बोलताना पाइन लॅब्जचे सीईओ बी अमरीश राव म्हणाले, “या निर्णयासाठी याहून चांगला मुहूर्त आम्हाला मिळाला नसता. या महिन्यामध्ये भारत स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत आहे आणि आपल्या देशाचे क्रीडानायक बर्मिंगहॅम येथे सुरू असलेल्या राष्ट्रकूल खेळांमध्ये सर्वोच्च किताब मिळविण्यासाठी झुंज देत आहेत. अशा महिन्यामध्ये ‘पाइन लॅब्ज सेकंड इनिंग्ज’ कार्यक्रमाच्या शुभारंभाची घोषणा करताना मला अत्यंत आनंद होत आहे. नाटेकर स्पोर्टस् अँड फिटनेसच्या सहयोगाने आम्ही हाती घेतलेला हा उपक्रम आपल्या राज्य/देशाच्या सेवेत आपले सर्वकाही समर्पित करणा-या भारतीय क्रीडानायकांच्या सक्षमीकरणासाठी राबविण्यात येत आहे. एका मोठ्या चळवळीची ही सुरुवात आहे असे आम्हाला ठामपणे वाटते व ही चळवळ केवळ पाइन लॅब्जपुरतीच मर्यादित राहता कामा नये. या महिन्यामध्ये काही ख-याखु-या चॅम्पियन्सचे स्वागत करताना आम्ही खूप आनंदी आहोत.”

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar