म्हापसा वाताहार अनसाभाट म्हापसा येथील गणेश मंदिर पंचायतन येथे गणेश क्लब यांनी आयोजित केलेल्या पाककला स्पर्धेत भारती सुभेदार हिने प्रथम क्रमांक प्राप्त
केला तर रजनी धारगळकर व देविदास यांनी अनुक्रमे दुसरा व तिसरा क्रमांक प्राप्त केला. उमा नाईक व निवा आमोणकर यांना उतेजनार्थ बक्षिसे मिळाली

सफेद व हिरवा वाटाणा पासून कोणताही पदार्थ बनविणे अशी ही स्पर्धा होती
परीक्षेचे परीक्षण राधा तळावलीकर व बेल्लसन फनाडिस यांनी केले. यावेळी गणेश पंचायतीचे अध्यक्ष प्रदिप शेटये, खास अतिथी पवन म्हावेलकर, संस्थेचे अध्यक्ष विवेक पेडणेकर, उपाध्यक्ष परेश वालावलकर, खजिनदार विराज म्हांमरे, तुकाराम हिरवे, शेफाली गोलतेकर, आदि उपस्थिती होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेश्वरी सावन तर विवेक पेडणेकर यांनी आभार मानले.