केरीत मंगलमय वातावरणात गणेश चतुर्थी साजरी

.

*केरीत मंगलमय वातावरणात गणेश चतुर्थी साजरी *

न्यू इंग्लिश हायस्कूल केरी येथे गणेशोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त माटोळी स्पर्धा, गजर, अभंग गायन आणि आरती स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. मुले आणि शिक्षकांनी गजर, अभंग आरत्या सादर करून उत्सवाचे मांगल्यमय वातावरण निर्माण केले.

कार्यक्रमाचे उदघाटन पेडणे विभागीय भाग शिक्षणाधिकारी छाया पेडणेकर यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणेम् हणून प्रख्यात गायक महेंद्र नार्वेकर , हरमल पंचक्रोशी उच्च माध्यमिक विद्यालयाचे अध्यापक शशिधर हलर्णकर, केरी शिक्षण संक्षेचे अध्यक्ष नारायण सोपटे केरकर , मुख्याध्यापक भावार्थ मांद्रेकर व अन्य मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात स्वागत नृत्याने झाली

विविध स्पर्धेचा निकाल
गजर गायन स्पर्धा अरुण गट
*प्रथम कुमार आरुष समीर तळकर*
*दुसरा साईश रत्नाकर सावळ*
शिशुवाटिका उदय गट
*पहिले बक्षीस लावणेश नामदेव राऊत*
*दुसरा बक्षीस कुमारी स्वरा तुकाराम सावळे*

आरती गायन स्पर्धा
*प्रथम बक्षीस इयत्ता तिसरीचा गट* आणि
*दुसरे बक्षीस पहिली चा गट*

अभंग गायन स्पर्धा दोन गटात घेण्यात आली पाचवी ते सातवी पहिला गट
*प्रथम बक्षीस इयत्ता सातवीचे मुलांना*
*दुसरे बक्षीस इयत्ता सहावीच्या मुलांना*

इयत्ता आठवी ते *दहावी प्रथम बक्षीस इयत्ता दहावी* आणि
*दुसरे बक्षीस नववीच्या मुलांना मिळाले*

*माटोळी स्पर्धा*
इयत्ता दहावी १) विनायक गोवेकर २) आनंद नाईक इयत्ता नववी १) मयंक पराष्टेकर २) रघुनाथ सावळ इयत्ता आठवी १) सर्वम तळकर २) समृध्दी सावळ इयत्ता सातवी १) कनिष्का तळकर २) देवयानी हजी इयत्ता सहावी १)भार्गवी मठकर
२) गतीक कासकर इयत्ता पाचवी
१) श्रेयल तळकर२) सक्षम नाईक

सर्व स्पर्धांचे परीक्षक म्ह्णून महेंद्र नार्वेकर आणि यशवंत पेडणेकर यांनी काम पाहिले.

यावेळी शाळेचे सर्व शिक्षक व शिक्षिका उपस्थित होत्या. त्यांनी भजनाचा कार्यक्रम सादर करून विद्यार्थ्यांची मने जिंकली.

सूत्रसंचालन सलोनी हर्जी यांनी केले. तर आभार प्रदर्शन दीक्षा माणगावकर यांनी केले.

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar