FMSCI आयोजित ‘द कारेन्स ड्राइव्ह’ च्या देखरेखीखाली किआ, 29.8 किमी प्रती लीटरचे सर्वोच्च मायलेज गाठले

.

*FMSCI आयोजित ‘द कारेन्स ड्राइव्ह’ च्या देखरेखीखाली किआ, 29.8 किमी प्रती लीटरचे सर्वोच्च मायलेज गाठले*

कारेन्स मालकांनी 84-किमी लांब ड्राइव्हवर सर्वोत्तम मायलेजसाठी स्पर्धा केली
श्रेणीतील विजेत्यांना 1 लाख आणि उपविजेत्यांना प्रत्येकी 50 हजार देऊन गौरविण्यात आले

ऑगस्ट, 2022: देशातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या कार निर्मात्यांपैकी एक असलेल्या किआ इंडियाने 7 ऑगस्ट 2022 रोजी दिल्ली-केंद्रशासीत प्रदेशामध्ये आपल्या महत्वपूर्ण अशा ग्राहकांसाठी ‘द कारेन्स ड्राइव्ह’ हा खास तयार केलेला ग्राहक अनुभव आयोजित केला. फेडरेशन ऑफ मोटर स्पोर्ट्स क्लब ऑफ इंडिया (FMSCI) द्वारे पर्यवेक्षित आणि प्रमाणित, या मोहिमेमध्ये 22 कॅरेन्स ग्राहकांनी त्यांच्या कारमधून सर्वोत्तम मायलेज मिळवण्यासाठी 84 किमीच्या ड्राईव्हवर स्पर्धा करताना पाहिले. ग्रेटर नोएडातील स्टेलर जिमखाना ते जेवारपर्यंत या मोहिमेला हिरवा झेंडा दाखवण्यात आला.

या मोहिमेमध्ये कॅरेन्स 4 श्रेणींमध्ये दिसून आल्या – मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक ट्रान्समिशनने जोडलेल्या पेट्रोल आणि डिझेल पॉवरट्रेन. प्रसिद्ध ऑटो ऍनालीस्ट टुटू धवन यांच्या नेतृत्वाखाली हा उपक्रम आयोजित करण्यात आला, ज्यात त्यांनी सहभागींसोबत मौल्यवान टिप्स शेअर केल्या. कारेन्स ड्राइव्हचा समारोप 4 विजेते आणि उपविजेत्याच्या घोषणेने झाला, ज्यापैकी प्रत्येकाने त्यांच्या प्रकारातून सर्वोत्तम मायलेजचा दावा केला. सर्व किआ कारेन्स मध्ये किमान 3 लोक होते आणि दावा केलेला सर्वोच्च मायलेज 29. 8 किलोमीटर प्रती लीटर होता जो विपिन त्यागी यांनी त्यांच्या डिझेल मॅन्युअल किआ कॅरेन्स सह गाठला. सर्व सहभागींनी मिळवलेले सरासरी मायलेज 23.5 किलोमीटर प्रती लीटर एवढे होते.

किआ इंडियाचे उपाध्यक्ष आणि विक्री व विपणन विभागाचे प्रमुख हरदीप सिंग ब्रार म्हणाले, “किआ मध्ये, आमचा सतत प्रयत्न असतो की केवळ श्रेणी-अग्रणी उत्पादनेच न आणता आमच्या महत्वपूर्ण ग्राहकांना नियमित कालावधीने सानुकूलित ब्रँड अनुभव दिला जातो. ‘कारेन्स ड्राईव्ह’ हा त्याच दिशेने आणखी एक उपक्रम आहे. कारेन्स ही किआच्या स्थिरतेमधील एक उल्लेखनीय ऑफर आहे आणि या वर्षी लॉन्च झाल्यापासून अनेकांची तीने मने जिंकली आहेत. ही अनुभवपूर्ण ड्राइव्ह कारेन्स एक परिपूर्ण फॅमिली कार असल्याचा पुरावा आहे. या मोहिमेने आम्हाला आमच्या कारेन्स कुटुंबाशी जोडले गेले आहे आणि हा कार्यक्रम यशस्वी केल्याबद्दल मी त्या सर्वांचे आभार मानू इच्छितो.”

स्वतःचा अनुभव सांगतांना, दिग्गज ऑटोमोटीव ऍनालीस्ट टूटू धवन म्हणाले, “मला नेहमीच अशा ड्राईव्हची आवड आहे जिथे ग्राहक त्यांच्या कारची मर्यादा तपासण्यासाठी एकत्र येतात. मला असे वाटते की, ब्रँड त्याच्या ग्राहकांना देऊ शकणारा हा अनुभवाचा सर्वात प्रामाणिक प्रकार आहे. आम्ही ड्राइव्हवर पाहिलेला आनंद आणि उत्साह दुर्मिळ आहे आणि या ग्राहकांना त्यांच्या कॅरेन्सबद्दल किती समाधान आहे हे दर्शविते. वाहनात 3 किंवा अधिक लोक बसून ग्राहकांनी मिळवलेले मायलेज त्याच्या दर्जेदार अभियांत्रिकीची साक्ष देते. माझे मत आहे की कारेन्स हे भारतातील अलिकडच्या काळात मिळालेल्या सर्वोत्कृष्ट फॅमिली मूव्हर्सपैकी एक आहे. मला आशा आहे की किआ इंडिया भारतातील त्यांच्या स्थापनेपासून ग्राहकांच्या गरजांवर लक्ष केंद्रित करेल.”

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar