.

हरमल येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या उत्सवात तरुण हौशी नाट्यमंडळातर्फे बुधवार 7 सप्टेंबर रोजी संध्याकाळी 7 वाजता संगीत ‘भाव तोचि देव’ नाटक गणेशोत्सव मंडळाच्या सभागृहात होणार असल्याची माहिती अध्यक्ष दिगंबर कोरकणकर यांनी दिली.

ह्या नाटकांचे दिग्दर्शन सिद्धेश परब,संगीत दिग्दर्शक महानंदू कोठावळे,देवेंद्र केपकर,तेजस तोरस्कर,निर्माता संदीप केपकर, हरेश मयेकर,पार्श्वसंगीत परेश नाईक,ध्वनिसंकलन शिरोडकर, बांदा व ह्या नाटकात
संदीप वायंगणकर,गुरुदास नानोस्कर,मिलन तोरस्कर,शशिकांत कोरकणकर,तुकाराम कुडव व शारदा शेटकर,सुधाकर साटेलकर व अभय नाईक यांच्या भूमिका आहेत.तत्पूर्वी सकाळी 10 वाजता कला अकादमीच्या भजन स्पर्धेतील प्रथम विजेते श्री शारदा संगीत विद्यालय,सडा वास्को व श्री लक्ष्मी संगीत विद्यालय,सावय वेरे ह्याचे भजन सादरीकरण,संध्याकाळी 3 वाजता बालभवन केंद्र,हरमल ह्याचे भजन, संध्याकाळी 4 वाजता ओम साई महिला भजनी मंडळ, बामणभाटी ह्याचे भजन अभय नाईक यांनी पुरस्कृत केले आहे.तरी भजनप्रेमी व नाट्य रसिकांनी आवर्जून उपस्थित राहावे असे आवाहन गणेशोत्सव मंडळातर्फे केले आहे.

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar