*इंडिया एसएमई फोरमने बेस्ट सेलर्स ऑफ इंडिया पुरस्कारांसाठी जाहीर केली पहिल्या १०० विक्रेत्यांची लघुयादी*
लघुयादीत बजाज इलेक्ट्रॉनिक्स, बिग सी, विवेक्स, लॉट मोबाइल्स, सिलेक्ट, आयटी वर्ल्ड, उषा यांसह अनेक विक्रेत्यांचा समावेश
इंडिया एसएमई फोरम या छोट्या व मध्यम उद्योगांसाठीच्या भारतातील सर्वांत मोठ्या, ना-नफा तत्त्वावरील संस्थेने, बेस्ट सेलर्स ऑफ इंडिया २०२२- रेकग्नाजयिंग फिजिटल एक्सलन्स इन साउथ इंडिया (Best Sellers of India Awards 2022 – Recognising Phygital Excellence in Southern India) या अशा प्रकारच्या पहिल्याच विक्रेता पुरस्कारांसाठी आघाडीच्या १०० विक्रेत्यांची लघुयादी जाहीर केली आहे.
दक्षिण भारतातील रिटेल विक्रेत्यांच्या अप्रतिम यशाचा व उत्कृष्ट कामगिरीचा या पुरस्काराद्वारे गौरव केला जाईल. नवीनतम तंत्रज्ञाने, क्रेडिट सुविधा व डिजिटल सोल्यूशन्सचा लाभ घेऊन ग्राहकांचे हित साधणारी सेवा देणाऱ्या विक्रेत्यांचा या पुरस्कारासाठी विचार केला जाईल. विक्रेत्यांनी केलेले वाढीला अनुकूल करार व कोविड साथीने उभ्या केलेल्या आव्हानांवर केलेली मात हे निकषही पुरस्कारासाठी वापरले गेले आहेत.
५ ऑगस्टपासून नामनिर्देशनाला सुरुवात झाली. त्यानंतर सुमारे महिनाभर सखोल मूल्यमापन व मूल्यांकन करून, इंडिया एसएमई फोरमने, तमिळनाडू, केरळ, कर्नाटक, आंध्रप्रदेश, तेलंगणा व गोवा या सहा दक्षिण भारतीय राज्यांमधील आघाडीच्या १०० विक्रेत्यांची लघुयादी तयार केली आहे. लघुयादीत समाविष्ट करण्यात आलेल्या या भागातील काही ठळक विक्रेत्यांमध्ये बजाज इलेक्ट्रॉनिक्स, विवेक्स, लॉट मोबाइल्स, सिलेक्ट, पै इंटरनॅशनल, प्रोटेल, बीन्यू, अॅप्ट्रॉनिक्स, एसव्ही कम्प्युटर्स, उषा, बीग सी, शार्पट्रॉनिक्स, सिरी मोबाइल्स अँड इलेक्ट्रॉनिक्स, रतन एअर कंडिशनर्स, सोनोव्हिजन, सेल पॉइंट यांचा समावेश आहे. नामनिर्देशन २५ सप्टेंबरपर्यंत सुरू राहील आणि लघुयादीत समावेशाची प्रक्रियाही पुढील २ आठवडे सुरू राहील.