*लघुनाट्य स्पर्धेत हरमल पंचक्रोशी अजिंक्य* *
मांद्रे गणेशोत्सव मंडळाने लघुनाट्य स्पर्धेचे आयोजन केले होते . ह्यात हरमल पंचक्रोशी हायस्कुल ने प्रथम क्रमांक पटकावला. हिरवे गुरुजी वर आधारित ‘रक्तरंगी सत्याग्रह’ या नाटकाचे सादरीकरण केले.अप्रतिम सादरीकरण केल्याने पंचक्रोशी हायस्कुल संघाला प्रथम परितोषिक मिळाले.
यात कु. सना सुधाकर साटेलकर,मैथिली श्यामसुंदर च्यारी,राही पुरुषोत्तम नाईक ,साची संजय परब, अभिषेक विनायक तारी,चंद्रकांत मोहन सावंत,गंगाराम पांडुरंग ठाकूर ,पार्थ भिमसेन नाईक , वेदांग प्रभाकर परब,,मित चंद्रकांत नानोस्कर,हनुमंत सुधाकर नाईक,,भावेश बाली वायंगणकर,कृष्णा सीताराम परब,आर्यन कमलेश सावंत,वेदांत विठ्ठल वायंगणकर यांनी उत्कृष्ट अभिनयाचे प्रदर्शन केले.
त्याच बरोबर उत्कृष्ट डायरेक्टर शिक्षक विशाल काळे यांना प्राप्त झाले. हे नाटक यशस्वी होण्यासाठी श्री दशरथ नाईक, मकरंद परब, सिद्धी प्रभू चोडणेकर व जिग्नेश पेडणेकर यांचे मार्गदर्शन लाभले या घवघवीत अशा यशाबद्दल मुख्याध्यापिका सौ स्मिता पार्सेकर व संपूर्ण संघाचे अभिनंदन होत आहे.
लघुनाट्य स्पर्धेत हरमल पंचक्रोशी अजिंक्य* *
.
[ays_slider id=1]