श्रीअंश सुभाजी व दक्षित सुभाजी यांचे यश. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवा निमित्त युवा आणि रुद्रेश्वर पणजी आयोजित अखिल गोवा वेशभूषा स्पर्धेत श्रीअंश व दक्षित सुभाजी यानी यश प्राप्त केले. युवा या संस्थेने आयोजित १ ते ५ वर्षे गटात दक्षित सुभाजी याने २रे बक्षीस तर ११ ते १६ या वयोगटात श्रीअंश सुभाजी याला प्रथम बक्षीस प्राप्त झाले. तसेच रुद्रेश्वर या संस्थेने आयोजित स्पर्धेत अ गटात दक्षित याला ४थे तर क गटात श्रीअंश याला २रे बक्षीस प्राप्त झाले. दोघेही बंधू हुतात्मा मनोहर पेडणेकर उच्च प्राथमिक स्कूल पेडणे येथे अनुक्रमे UKG व इयत्ता ५ वित शिकत आहेत. त्यांच्या या यशाबद्दल त्यांचं सर्वत्र कौतुक होत आहे.