चर्चद्वारा संचलित सर्व आश्रयकेंद्रांची नियमित चौकशी आणि पाहणी करा !  – श्री. अनिल धीर, भारत रक्षा मंच

.
चर्चद्वारा संचलित सर्व आश्रयकेंद्रांची नियमित चौकशी आणि पाहणी करा !
 – श्री. अनिल धीर, भारत रक्षा मंच

      देशातील विविध भागांत चर्चमध्ये जेव्हा लहान मुलांचे लैंगिक शोषणमहिलांवरील अत्याचाराच्या घटना घडताततेव्हा शहरात काही प्रमाणात ही प्रकरणे उजेडात तरी येतातही उजेडात आलेली प्रकरणे केवळ हिमनगाचे टोक आहेतमात्र आदिवासीबहुल आणि ग्रामीण भागात जेव्हा चर्चशी संबंधित अशा घटना घडताततेव्हा कोणाला कळतसुद्धा नाहीतभारतात चर्चच्या वतीने चालू असलेले अपप्रकार पाहताचर्चद्वारा संचलित सर्व आश्रयकेंद्रांची राज्य सरकारांनी नियमित चौकशी आणि पाहणी करावीअशी मागणी ‘भारत रक्षा मंच’चे राष्ट्रीय महामंत्री श्रीअनिल धीर यांनी केलीहिंदु जनजागृती समिती आयोजित ‘चर्चद्वारा संचालित आश्रयकेंद्र कि अत्याचार केंद्र ?’ या विषयावरील ‘ऑनलाईन’ विशेष संवादात बोलत ते होते.

     श्रीअनिल धीर पुढे म्हणाले कीजेव्हा चर्चमध्ये अत्याचार होताततेव्हा मुख्य प्रसारमाध्यमे शांत असतातमात्र हिंदू साधुसंत यांच्यावर आरोप होताततेव्हा तो विषय उचलून धरला जातोहा दुटप्पीपणा आहेभारतातील चर्चसाठी मोठ्या प्रमाणात विदेशातून पैसा पुरविला जातोसरकारचे यावर काहीही नियंत्रण नाही.

      तेलंगणा येथील ‘ख्रिश्चन स्टडीज’च्या अध्ययनकर्त्या इस्टर धनराज म्हणाल्या कीख्रिस्ती संस्था महिला आणि लहान मुलांच्या शोषणाचे केंद्र बनत आहेतहे नवीन नसून 1980 च्या दशकापासून चर्चमधील अत्याचारांची प्रकरणे संपूर्ण जगभरातून उजेडात आलीया चर्चमधील अत्याचारांमागे कारणीभूत असलेल्या पाद्र्यांना वेगवेगळ्या चर्च व्यवस्थापनाने शिक्षा न करता पाठीशी घातलेभारतासह जगभरातून या सर्व चर्चमधून मोठ्या प्रमाणात आर्थिक घोटाळे होत असतांना यांविषयी चर्चाही कुठे होतांना दिसत नाहीमात्र मंदिरांत पैशांचा गैरव्यवहार होईलहे कारण पुढे करून अजूनही सरकारने मंदिरे आपल्या ताब्यात ठेवली आहेत.

     हिंदु जनजागृती समितीच्या रणरागिणी’ शाखेच्या कुप्रतीक्षा कोरगावकर म्हणाल्या कीनवी मुंबई येथील ‘बेथेल गॉस्पेल चॅरिटेबल ट्रस्ट’च्या चर्चमधील वसतीगृहातील अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचाराचे प्रकरण नुकतेच समोर आलेया प्रकरणासह देशभरात सर्वत्र चर्चच्या अंतर्गत असलेल्या आश्रयकेंद्रांच्या चौकशीसाठी सरकारने समिती नेमावीतसेच गैरप्रकार होत असलेल्या चर्चच्या आश्रयकेंद्रांची नोंदणी कायमस्वरूपी रहित करावीअशी ‘रणरागिणी’ची मागणी आहे.  

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar