*‘इंडियन मेडिकल असोसिएशन’च्या तिसवाडी शाखेच्या वैद्यकीय शैक्षणिक कार्यक्रमात महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या वतीने ‘मनोविकार आणि अध्यात्मशास्त्र’ या विषयावर प्रबोधन !*
महर्षि अधात्म विश्वविद्यालयाच्या वतीने ‘इंडियन मेडिकल असोसिएशन’च्या (आय.एम्.आय.च्या) तिसवाडी शाखेच्या ‘सी.एम्.ई.’ (CME) मध्ये ‘अध्यात्मशास्त्राचे मनोविकारांमागील कारणे, उपचार आणि प्रतिबंध यांतील स्थान’ या विषयावर नुकतेच पावरपॉईंटच्या माध्यमातून ऑनलाईन सादरीकरण करण्यात आले. महर्षि अधात्म विश्वविद्यालयाच्या संशोधन विभागाच्या समन्वयक सेविका डॉ. (सौ.) नंदिनी सामंत (मानसोपचारतज्ञ) यांनी हे सादरीकरण केले. या कार्यक्रमाचे आयोजन इंडियन मेडिकल असोसिएशनच्या तिसवाडी शाखेच्या कार्यकारी समितीने केले होते. विशेष म्हणजे या कार्यक्रमाचे आयोजन शाखेच्या अधिकृत सी.एम्.ई. (CME) कार्यक्रमात करण्यात आले होते.
या वेळी डॉ. (सौ.) नंदिनी सामंत यांनी सादरीकरण करतांना पुढील सूत्रे मांडली. जगभरातील वैद्यकीय क्षेत्रात अध्यात्मशास्त्राबद्दल जिज्ञासा वाढत चालली आहे. अध्यात्म या विषयावर सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी भरीव असे संशोधनात्मक कार्य केले आहे. या संशोधनानुसार जीवनातील ८० टक्के समस्यांवर पूर्ण आणि कायमस्वरूपी मात करण्यासाठी आध्यात्मिक उपायांची आवश्यकता आहे. मानसिक, तसेच अन्य समस्या यांवर यशस्वी मात करण्यासाठी स्वभावदोष-निर्मूलन प्रक्रिया राबवणे, सात्त्विक जीवनशैली अंगिकारणे, आध्यात्मिक उपाय आणि साधना करणे या सामायिक चार-सूत्री पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. डॉ. (सौ.) नंदिनी सामंत यांनी या वेळी स्वभावदोष-निर्मूलन प्रक्रिया, सात्त्विक जीवनशैली अंगिकारणे, आध्यात्मिक उपाय आणि साधना या चारही सूत्रांच्या संदर्भात महर्षि अधात्म विश्वविद्यालयाच्या वतीने विविध उपकरणे, तसेच सूक्ष्मातून करण्यात आलेले संशोधन याविषयी सविस्तर माहिती दिली. आध्यात्मिक कारणे सूक्ष्म असूनही रुग्णाच्या आजारामागील मूलभूत कारण आध्यात्मिक असल्याचे बुद्धीने कसे ओळखायचे ? याविषयी त्यांनी माहिती दिली.
आपला नम्र,
*श्री. आशिष सावंत,*
संशोधन विभाग, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय.
(संपर्क : 9561574972)