सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी सामाजिक उपक्रम राबवून स्तुत्य कार्य चालवले आहे. मांद्रे गणेशोत्सव मंडळ त्यात आघाडीवर आ

.

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी सामाजिक उपक्रम राबवून स्तुत्य कार्य चालवले आहे. मांद्रे गणेशोत्सव मंडळ त्यात आघाडीवर आहे. सर्वांसाठी विविध स्पर्धा आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा शिष्यवृत्ती देऊन गौरव करून आपले योगदान देत आहे ही चांगली बाब आहे, असे प्रशंसोद्‌गार गोवा गृहनिर्माव मंडळाचे अध्यक्ष आमदार जीत आरोलकर यांनी काढले.
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, मांद्रेच्या ३७ व्या बक्षीस आणि शिष्यवृत्ती वितरण सोहळ्यात आमदार जीत आरोलकर प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी व्यासपीठावर माजी मुख्यमंत्री प्रा. लक्ष्मीकांत पार्सेकर, माजी शिक्षण मंत्री सौ. संगीता परब, जिल्हा पंचायत सदस्य सतीश शेटगावकर, सरपंच अमित सावंत, मांद्रे हायस्कूलचे मुख्याध्यापक विवेक बोडके, पंचायत सदस्य सौ. तारा बाबुसो हडफडकर, प्रशांत (बाळा) नाईक, किरण सावंत, राजेश मांद्रेकर, मिंगेल गाब्रिएल (रोझा) फर्नांडिस, सौ. संपदा गोविंद आजगावकर, सौ. मिशेल शेरॉन आम्रोज फर्नांडिस, महेश कोनाडकर, मंडळाचे अध्यक्ष सुनील पुर्खे, सचिव सोमनाथ पार्सेकर, खजिनदार मुकेश जठार उपस्थित होते.
माजी मुख्यमंत्री प्रा. लक्षीकांत पार्सेकर यांनी गुणवंत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. मंडळाच्या विविध उपक्रमांमुळे अनेकांना आपले कलागुण दाखवण्यास संधी मिळते. मंडळ सचोटीने काम करत असल्याबद्दल त्यांनी मंडळाचे कौतुक केले.
यावेळी सौ. संगीता परब, सतीश शेटगावकर यांचीही भाषणे झाली.
या सोहळ्यात गणेशोत्सव मंडळाने आयोजित केलेल्या विविध स्पर्धांचे बक्षीस वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. शालेय स्तरावरील प्राथमिक विभागात मांद्रे हायस्कूलला आणि माध्यमिक विभागात हरमल पंचक्रोशी हायस्कूलला मंडळातर्फे उत्कृष्ट कामगिरीबद्दल लोकमान्य बाळ गंगाधर टिळक चषक प्रदान करण्यात आले.
प्राथमिक विद्यालय, दहावी आणि बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देऊन मंडळातर्फे गौरविण्यात आले.
सचिव सोमनाथ पार्सेकर यांनी सोहळ्याचे सूत्रसंचालन केले. मंडळाचे उपाध्यक्ष किशोर शेट मांद्रेकर, सदस्य रावजी कोनाडकर यांनी बक्षीस वितरण आणि शिष्यवृत्ती वितरण कार्यक्रमाचे सूत्रनिवेदन केले. सहसचिव उल्हास म्हामल यांनी मंडळाचा अहवाल सादर केला. सहखजिनदार निलेश (केशव) मांद्रेकर यांनी सोहळ्याचे संयोजन केले. सरपंच तथा कार्यक्रम समिती प्रमुख अमित सावंत यांनी प्रास्ताविक केले. अध्यक्ष सुनील पुर्खे यांनी आभार मानले.

फोटोः
मांद्रे हायस्कूलच्या प्राथमिक विभागाला विविध स्पर्धांतील उत्कृष्ट कामगिरीबद्दल गणेशोत्सव मंडळातर्फे लोकमान्य टिळक चषक प्रदान करताना आमदार जीत आरोलकर. सोबत संगीता परब, विवेक बोडके, सतीश शेटगावकर, अमित सावंत व इतर.

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar