आगरवाडा ते मांद्रे या दरम्यान प्रमुख जिल्हा मार्ग १७ वरील रस्त्याच्या बाजूला विजेच्या भूमिगत केबल्स टाकताना वीज खात्याचा कंत्राटदार आणि सार्वजनिक बांधकाम खात्याने सुरक्षिततेच्या दृष्टीने कोणत्याही उपाययोजना हाती न घेतल्याने

.

मांद्रे वाताहार

आगरवाडा ते मांद्रे या दरम्यान प्रमुख जिल्हा मार्ग १७ वरील रस्त्याच्या बाजूला विजेच्या भूमिगत केबल्स टाकताना वीज खात्याचा कंत्राटदार आणि सार्वजनिक बांधकाम खात्याने सुरक्षिततेच्या दृष्टीने कोणत्याही उपाययोजना हाती न घेतल्याने वाहनचालकांना धोका निर्माण झाला आहे. याप्रकरणी त्वरित कार्यवाही करावी अशी मागणी ‘स्वराज’ संस्थेने केली आहे.
‘स्वराज’चे निमंत्रक अॅड. प्रसाद शहापुरकर यांनी सार्वजनिक बांधकाम खात्याचा रस्ता विभाग, वीज खाते आणि मांद्रे ग्रामपंचायत यांना वीज केबल्ससाठी भूमिगत वाहिनी खोदताना निर्माण झालेल्या धोकादायक स्थितीकडे तक्रारीद्वारे लक्ष वेधले आहे. सध्या आगरवाडा येथे चढणीवर प्रमुख जिल्हा मार्ग १७ वर काम सुरू आहे. केबल्स टाकण्यासाठी रस्त्याकडेला मोठे चर खोदले आहे. त्यामधील मातीच्या थरांनी अर्ध्याहून अधिक रस्ता व्यापला आहे. पावसामुळे सर्व रस्ता निसरडा झाला असून रोज दुचाकीस्वार घसरून पडत आहेत. काहीजण जखमी झाले आहेत. वाहतुकीला मातीच्या थराचा अडथळा होत आहे. हा रस्ता नेहमीच वर्दळीचा असल्याने वाहतुकीची कोंडी होत आहे. संबंधित कंत्राटदाराने कामाच्या ठिकाणी कोणत्याही सुरक्षिततेच्या उपाययोजना हाती घेतलेल्या नाहीत. वाहतूक एकेरी होत आहे. कामाच्या ठिकाणी वाहतूक पोलिस ठेवण्यात यावेत. शिवाय रस्त्यावरील माती आणि दगड नियमितपणे बाजूला सारून रस्ता वाहतुकीसाठी सुरक्षित ठेवणे आवश्यक आहे. रात्रीच्यावेळी तर वाहनचालकांची या भागात त्रेधा उडत आहे. हा सर्व प्रकार धोकादायक असून वीज खात्याचा कंत्राटदार आणि सार्वजनिक बांधकाम खाते वाहनचालकांच्या जिवाशी खेळत आहे. बांधकाम खात्याचे अधिकारीही या हलगर्जीपणाकडे डोळेझाक करीत असल्याबद्दल अॅड. प्रसाद शहापुरकर यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. चोवीस तासाच्या आत आवश्यक उपाययोजना न केल्यास संबंधितांना ‘स्वराज’चे सदस्य जाब विचारतील, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar