_*हिंदु जनजागृती समितीच्या द्विदशकपूर्तीच्या निमित्ताने मये येथे हिंदूसंघटन मेळावा*_
*हलाल प्रमाणित उत्पादनांच्या विरोधात प्रत्येक गावात कृती समिती स्थापन करा ! – श्री. मनोज खाडये, गोवा व पश्चिम महाराष्ट्र धर्मप्रसारक, हिंदु जनजागृती समिती*
डिचोली, 14 सप्टेंबर – हलाल प्रमाणित उत्पादने वापरणे म्हणजे आपण स्वतः आपणासाठीच मृत्यूचा सापळा रचणे होय! हलाल जिहाद हे मोठे षड्यंत्र आहे आणि याविरोधात हिंदु जनजागृती समितीने लढा उभारला आहे. या लढ्यात सर्व हिंदूंनी सहभागी व्हायला हवे. हलाल प्रमाणित उत्पादनांच्या विरोधात प्रत्येक गावात कृती समिती स्थापन करणे आवश्यक आहे, असे आवाहन हिंदु जनजागृती समितीचे गोवा व पश्चिम महाराष्ट्र धर्मप्रसारक श्री. मनोज खाडये यांनी केले. मये, डिचोली येथील श्री आदिनाथ सांप्रदाय मठ या ठिकाणी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने आयोजित हिंदुसंघटन मेळाव्यात श्री. मनोज खाडये बोलत होते. हिंदु जनजागृती समितीच्या द्विदशकपूर्तीच्या निमित्ताने या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी व्यासपीठावर ‘श्री आदीनाथ संप्रदाया’चे श्री. सखाराम पेडणेकर व हिंदु जनजागृती समितीचे दक्षिण गोवा समन्वयक श्री. सत्यविजय नाईक यांची उपस्थिती होती.
श्री. मनोज खाडये पुढे म्हणाले, ” संपूर्ण जगाला इस्लामीक बनवण्यासाठी विविध प्रकारचे जिहाद केले जात आहेत. हलाल जिहादच्या माध्यमातून आतंकवादी संघटनांना भारतात विविध ठिकाणी आतंकवादी कारवाया करण्यासाठी निधी पुरवला जातो.” श्री. मनोज खाडये यांनी या वेळी सौन्दर्य प्रसादने, खाद्यपदार्थ, वैद्यकीय उत्पादन, वाहतूक अशा विविध क्षेत्रांत उपलब्ध असलेल्या हलाल प्रमाणित उत्पादनाविषयी उपस्थितांना माहिती दिली. ‘श्री आदीनाथ संप्रदाया’चे श्री. सखाराम पेडणेकर म्हणाले, ”हिंदु जनजागृती समितीच्या 20 वर्षांपूर्वी लावलेल्या रोपट्याचा आता वटवृक्ष झाला आहे. समितीच्या हिंदु राष्ट्राची स्थापना या संकल्पाची पूर्तता करण्यासाठी आता सर्व संप्रदाय, मंदिरे आदींनी एकत्रितपणे कार्य करण्याची आवश्यकता आहे. मेळाव्यात श्री. मनोज खाडये यांच्या हस्ते ‘गोसेवा प्रतिष्ठान’चे श्री. भरतेश गुळांणवर यांचा गोसेवेच्या कार्य करत असल्याने गौरव करण्यात आला. मेळाव्यात ‘हलाल जिहाद’ या विषयावर एक व्हिडिओ दाखवण्यात आला. मेळाव्यात अखेर हिंदु राष्ट्राच्या स्थापनेची उपस्थित धर्माभिमानी शपथ घेतली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हिंदु जनजागृती समितीचे उत्तर गोवा समन्वयक श्री. गोविंद चोडणकर यांनी केले. आभार श्री. सत्यविजय नाईक यांनी मानले.
आपला विश्वासू,
*डॉ. मनोज सोलंकी*
हिंदु जनजागृती समिती, (संपर्क : 9326103278 )