स आणि कर्नाटक सरकारने टीसीएस रूरल आयटी क्विझ २०२२ची घोषणा केली

.

स आणि कर्नाटक सरकारने टीसीएस रूरल आयटी क्विझ २०२२ची घोषणा केली
टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस आणि कर्नाटक सरकारच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केली जाणारी ही क्विझ भारतभरातील छोट्या शहरांमधील विद्यार्थ्यांमध्ये आयटीबाबत जागरूकता वाढवते.
बंगलोर, ७ सप्टेंबर २०२२: टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) (बीएसई: 532540, एनएसई: TCS) आणि कर्नाटक सरकारच्या इलेक्ट्रॉनिक्स, आयटी, बीटी आणि विज्ञान व तंत्रज्ञान विभागाने घोषणा केली आहे की टीसीएस रूरल आयटी क्विझच्या २३व्या आवृत्तीमध्ये भाग घेण्यासाठी नोंदणी देशभरात सुरु झाली आहे. बंगलोर टेक समिट २०२२ चा एक भाग म्हणून या क्विझचे आयोजन केले जाईल.
या क्विझमध्ये ऑनलाईन टेस्ट्स आणि व्हर्च्युअल व फिजिकल क्विझ शो देखील असतील. छोट्या शहरांमधील व जिल्ह्यांमधील आठवी ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना यामध्ये भाग घेण्यासाठी प्रोत्साहन दिले जाते. शहर महानगरपालिकांच्या हद्दीच्या आत असलेल्या शाळा यामध्ये सहभागी होऊ शकत नाहीत.
टीसीएस रूरल आयटी क्विझमध्ये विविध क्षेत्रांमध्ये तंत्रज्ञानाच्या वापरावर लक्ष केंद्रित केले जाते, यामध्ये तंत्रज्ञान पर्यावरण, व्यापार, लोक, नवे ट्रेंड्स आणि लीजेंड्स यांचा समावेश आहे. इंटरनेटचे जग व अनोख्या वेबसाईट्स, आयटी बझवर्ड्स, एक्रोनिम्स, आयटी क्षेत्रातील राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील ख्यातनाम व्यक्ती, कम्युनिकेशन कंपन्या, सॉफ्टवेयर उत्पादने आणि आयटीचा इतिहास हे विषय या क्विझमध्ये अंतर्भूत केले जातात. या क्षेत्रांवर आयटीचा प्रभाव पडला आहे त्यांना देखील या क्विझमध्ये समाविष्ट केले जाते, उदाहरणार्थ, शिक्षण, मनोरंजन, पुस्तके, मल्टिमीडिया, संगीत, सिनेमा, इंटरनेट, बँकिंग, जाहिरात, खेळ, गेमिंग, सोशल नेटवर्किंग आणि मोबाईल्सचे जग.
टीसीएस रूरल आयटी क्विझमध्ये संपूर्ण देशभरात आठ रिजनल फायनल्स होतात. प्रत्येक रिजनल फायनलच्या विजेत्याला बंगलोरमध्ये नोव्हेंबर महिन्यात होणार असलेल्या राष्ट्रीय अंतिम फेरीसाठी आमंत्रित केले जाईल. सर्व रिजनल विजेत्यांना प्रत्येकी १०,००० रुपयांचे व उपविजेत्यांना प्रत्येकी ७,००० रुपयांचे गिफ्ट व्हाउचर्स दिले जातील. टीसीएस रूरल आयटी क्विझच्या भाग्यशाली राष्ट्रीय विजेत्याला/विजेतीला १,००,००० रुपयांची टीसीएस एज्युकेशन स्कॉलरशिप आणि राष्ट्रीय उपविजेत्याला/उपविजेतीला ५०,००० रुपयांची स्कॉलरशिप व इतर अनेक बक्षिसे देऊन गौरवण्यात येईल.
नोंदणी: विद्यार्थ्यांना १८ सप्टेंबर २०२२ पूर्वी https://iur.ls/tcsruralitquiz2022reg याठिकाणी नोंदणी करावी लागेल.
सन २००० पासून, टीसीएस कर्नाटक सरकारच्या इलेक्ट्रॉनिक्स, आयटी, बीटी आणि विज्ञान व तंत्रज्ञान विभागाच्या संयुक्त विद्यमाने रूरल आयटी क्विझचे आयोजन करत आहे. भारतातील लहान शहरे आणि जिल्ह्यांतील विद्यार्थ्यांमध्ये माहिती-तंत्रज्ञानाविषयी जागरूकता वाढवणे, तंत्रज्ञानाच्या जगात होत असलेल्या नवनवीन घडामोडींची माहिती त्यांना देणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे. आजपर्यंत हा उपक्रम 200 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचला आहे. भारतातील ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी पहिली आयटी क्विझ म्हणून लिम्का बुक ऑफ रेकॉर्डस् मध्ये त्याची नोंद करण्यात आली आहे.

About Tata Consultancy Services (TCS)
Tata Consultancy Services is an IT services, consulting and business solutions organization that has been partnering with many of the world’s largest businesses in their transformation journeys for over 50 years. TCS offers a consulting-led, cognitive powered, integrated portfolio of business, technology and engineering services and solutions. This is delivered through its unique Location Independent Agile™ delivery model, recognized as a benchmark of excellence in software development.
A part of the Tata group, India’s largest multinational business group, TCS has over 606,000 of the world’s best-trained consultants in 55 countries. The company generated consolidated revenues of US $25.7 billion in the fiscal year ended March 31, 2022, and is listed on the BSE (formerly Bombay Stock Exchange) and the NSE (National Stock Exchange) in India. TCS’ proactive stance on climate change and award-winning work with communities across the world have earned it a place in leading sustainability indices such as the MSCI Global Sustainability Index and the FTSE4Good Emerging Index. For more information, visit www.tcs.com
TCS media contacts:
Asia Pacific
Email: wenjian.lin@tcs.com | Phone: +65 9695 9948

Australia and New Zealand
Email: kelly.ryan@tcs.com | Phone: +61 422 989 682

Canada
Email: tiffany.fisher@tcs.com | Phone: +1 416 456 7650

Europe
Email: joost.galema@tcs.com | Phone: +31 615 903387

India
Email: saxena.kritika@tcs.com| Phone: +91 22 6778 9999
Email: vanshika.sood@tcs.com | Phone: +91 22 67789098

Middle East & Africa
Email: s.hasneen@tcs.com | Phone: +971567471988

Japan
Email: douglas.foote@tcs.com | Phone: +81 80-2115-0989

Latin America
Email: alma.leal@tcs.com | Phone: +521 55 2095 6098

UK
Email: peter.devery@tcs.com | Phone: +44 20 3155 2421

USA
Email: james.sciales@tcs.com | Phone: +1 917 981 7651

###

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar